या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें.. ग्रंथ निव्वळ इंग्रजी ग्रंथाचेंच भाषांतर असल्यामुळे भाषासौष्ठवाखेरीज इतर गुण व्यक्त करण्यास कांहींच मार्ग नव्हता. ह्या ग्रंथाची गोष्ट त्याहून फार भिन्न आहे. ह्या ग्रंथालाही अनेक परकी ग्रंथांचा आधार आहे खरा; परंतु ते केवळ साक्षीभूत आहेत. आणखी, हा विषयही असाच आहे की, ह्यास प्राचीन ग्रंथांचे साहाय्य घेतल्यावांचून कोणासच कांही लिहिता येणार नाही. 'इतिहास' हा विषय आधीच मोठा गहन, अत्यंत महत्त्वाचा, लोकोपयोगी, विशाळ, व भानगडाचा असा आहे. आणि त्यांतून आमच्या ह्या हतभाग्य देशाच्या संबंधाने तर त्याची स्थिति खरोखरच फार शोचनीय आहे. पण 'आहे' ह्मणण्यापेक्षा होती' असें ह्मणण्यासही आह्मांस काही दिकत वाटत नाही. कारण रावसाहेब सरदसाई ह्यानी 'मुसलमानी रियासती' च्या रूपाने-समग्र नसला तरी-पुष्कळ अं. शान तिचा उद्धार केला असें झणण्यांत अतिशयोक्ति होईल असें ह्मणण्यास फारसे कोणी धजेल असे वाटत नाही, साप्रत आमच्या देशाचें कांहीं दर्दैव ओढवलेलें आहे की, त्याने प्रत्येक बाबतींत दसऱ्याच्या तोंडाने पाणी प्यावें, परंतु आर्यावते व सुवर्णभूमा अशा चार मातापितराच्या पोटी आह्मी राजबिंडे निपजलों असल्यामुळे 'डॉन किग्झोट' सारखा शिलेदारी बाणा पतकरून. रुंदीशिवाय लांबी' अशा खंद्या वारूवर आरूढ होऊन वासराच्या घोट्याने ताक पोहे प्यावेत हेही साहजिकच आहे ! श्रीमंतांच्या मुलांनी खुशालचेंडू बनणे, पूर्वजांचा नावलौकिक राखण्यासाठी सरदार लोकांनी मिशांस तूप लावन बाहेर पडणे, प्रभूस कारागृहांत सोडून 'गादीचे संरक्षण करण्यासाठी राजवाड्याभोवती प्रदक्षिणा घालणे, हा आलीकडे आमचा सांप्रदायच बनून गेलेला आहे. बाबरबादशहा घोड्यावर बसून दोन दिवसांत १६० मैल जात असे. दोन वेळ तर गंगानदीचें विशाल पात्र बाहुब. लाने तरून गेला. पण त्याच्याच पांचव्या वंशजाची झणजे औरंगजेबाची स्थिति पहा! त्याच्या सरदाराला मलमलीचा पोषाख जड वाढू लागला. स्वारीत जातांना सरदार लोक नेचा ओढीत पलंगावर निजावयाचे, आणि नोकरांनी पलंगच्या पलंग वाहून न्यावयाचे! अशी ही परंपराच आहे. आमची दृष्टि इतकी मंद झाली आहे की, विलायती चष्मा लावल्यावांचून आझांस कोणताच पदार्थ नीट न्याहाळत नाही. आमच्या घरांतला-अगदी परसांतला जिन्नस असला तरी, पाश्चात्य लोकांनी दाखवून दिल्यावांचून, त्याची किंमत सांगितल्यावांचून, त्याची आझांस ओळख होत नाही. फार तर काय ? पण आमचे बापजादे कोण आहेत,