या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. १९७ दुसऱ्यांच्याही कामाचे नव्हेत-तेव्हां ते पृथ्वीवर केवळ भारभूत नव्हेत काय ? असे लोक नाहीसे झाले तरी, ते गेले मेल्याची कोणांस आठवण सुद्धा होत नाही, व त्यांच्याबद्दल कोणास खेदही पण होणार नाही. साया आळशांची स्थिति अत्यंत शोचनीय व लाजिरवाणी असते. परिश्रम करणारांच्या बरोबरीने जगाला कोणी मदत केली ? आपखुषीनें ह्मणा किंवा भाग पडले ह्मणून ह्मणा ज्या त्या मनुष्यांना उद्योग करावा लागला आहे. आपण ज्याला उन्नति, सुधारणा, हित, किंवा भरभराट असे ह्मणतों ती सर्व उद्योगावर अवलंबून आहेत. गव्हांच्या लागवडीपासून तो आगबोटीच्या बांधणीपर्यंत; गळपट्ट्याला टांका मारण्यापासून तो सारी दुनिया झुलत राहते, अशा मनमोहक पुतळ्यापर्यंत सारी मेहनत खर्ची पडलेली आहे. तसेच सर्व उपयुक्त व सुंदर विचार ही श्रमाची, अभ्यासाची, अव. लोकनाची, शोधांची, व मेहनतीची फळे होत. दृढनिश्चयाने व काळजीपूर्वक श्रम केल्यावांचन कधी सरस कविता होणार नाही, आणि तिचा चिरकालिक नादही घुमत राहणार नाही. कोणतेही मोठे काम एका झटक्यासरशी कधीच होत नाही. अनेक वेळां ठेचा खाव्यात; पुन्हा पुन्हा यत्न करावा: तेव्हांच ते साध्य होते. एक पिढी आ करत, व दुसरी ते पुढे चालू ठेवते. आणि पुढची पिढी मागच्या पिढाला धरून चाललेली असते. पार्थेनानला चिखलाच्या झोपड्यापासूनच प्रारंभ झाला. शेवटच्या न्यायाला तर, यःकश्चित् वाळूवरच्या सध्यानीच सुरुवात झाली आहे. जगांतील प्रत्येक व्यक्तींना हीच गोष्ट लागू आहे. त्या यःकश्चित् प्रयत्नानेंच आरंभ करतात, आणि मग त्याचा पिच्छा पुरवून त्याला फलद्रूप करून सोडतात. उद्योगाचा इतिहास पाहिला तर, त्यांतील उदाहरणे ह्याच नियमाशी तुल्य आढळतात. उद्योगाने अतिशय गरिब मनुष्याला सुद्धां, उच्चपद मिळवितां आलें नाहीं तरी, सन्मान मिळवितां येतो. विद्या, कला आणि शास्त्रे ह्यांच्या इतिहासांत जी मोठमोठाली नांवें झळकतात, ती अशा उद्योगी मनुष्यांचीच होत. केवळ एक लोहार होता, त्याने आझांला वाफेचे यंत्र तयार करून दिले; एका न्हाव्याने पिंजण्याचे यंत्र काढले; एका कोष्टयाने एक विणण्याचे यंत्र काढले; एका खाणवा