या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. ल्याने एंजिनला एका स्थळाहून दुसऱ्या स्थळी जाईसें केलें. ह्याप्रमाणे सर्व जातींच्या कामगारांनी एकामागून एक यंत्रशास्त्राच्या सिद्धीस भर घातली. उद्योग करणारे लोक ह्मणजे केवळ शरीरकष्टाने किंवा आंगमेहनतीनेच झटणारे असे आमचे झणणे नाही. तसला उद्योग काय घोडा सुद्धां करूं शकेल. तर जो मनुष्य आपल्या मेंदूनें-आपल्या अकलेनें काम करतो, तोच श्रेष्ठप्रतीचा उद्योगी होय. आणि ज्याची सारी शरीरघटनाच उच्च शक्तीच्या ताब्यांत असते, तोही त्याच वर्गीतला. जो मनुष्य चित्रे काढतो, जो पुस्तके लिहितो, जो कायदे करतो, जो कविता रचतो, तो अत्यंत श्रेष्ठप्रतीचा काम करणारा होय. पण नांगऱ्याच्या व धनगराच्या शरीरकष्टाची लोकांस जितकी जरूरी आहे, तितकी ह्यांच्या श्रमाची नाही. तथापि समाजाला जी अत्युच्च मानसिक पुष्टि मिळते, ती सुद्धां कांहीं कमी महत्वाची नाही. इतक्या वेळपर्यंत उद्योगाचे महत्व व आवश्यकता ह्याविषयी बरेंच सांगितले. आतां उद्योग केल्याने काय काय फायदे होतात त्याचा विचार करूं या. हे तर उघडच आहे की, चातुर्याची, कलाकौशल्याची, नव्या शोधाची आणि बुद्धिमत्तेची कमावणी, ह्यांचे संरक्षण केले नसतें तर, मनुष्याची रानटी स्थितिच कायम राहिली असती. जगाची ऊर्जितावस्था ह्मणजे जगाची काटकसरच होय. श्रमाचे फळ ती काटकसर. उद्योगी मनुष्य काटकसर करूं लागला, तर तोही सुधारणेच्या संग्रहाचाच परिणाम, ह्मणून समजावें. आह्मीं सांगितलेच आहे की, काटकसर ही सुशिक्षितपणाबरोबरच अस्तित्वात आली आहे. आझाला असे सुद्धा ह्मणतां येईल की, काटकसरीनेच सुशिक्षितपणा उत्पन्न केला आहे. काटकसरीपासून भांडवल उत्पन्न होते. आणि भांडवल हे साखरेत पाकविलेले श्रमाचे फळ होय. आणि भांडवलवाला ह्मणजे फक्त कामधंदा करून मिळविलेलें सारें खर्च करीत नाहीं तो. काटकसर हा कांहीं मूळचा स्वभावसिद्ध गुण नाही. तर तो एक वतेनापासून प्राप्त झालेला गुण आहे. ह्यामध्ये आत्मनिरोधाचा अंतर्भाव होतो. पुढील सुखाकरितां आजच्या सुखावर पाणी सोडावयाचे. व विचार, दूरदृष्टि आणि सारासारज्ञान, ह्यांची वासनेला ताबेदाही