या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. १६९ करावयास लावावयाचे. ती काम करते आजचें, पण तजवीज करून ठेवते उद्यांची. ती आपण जमविलेले भांडवल व्याजी लावते, आणि पुढील ततूद राखते. मिस्तर एडवर्ड डेनिसन ह्मणतो "दूरवर दृष्टि पोंचविण्याचा हक्क मनुष्याला विचाराने प्राप्त झालेला असतो, आणि त्याच्या बरोबरच पुढची तजवीज करण्याचे कर्तव्यही त्यास लागलेले असते. ह्याच्या सत्यत्वाबद्दल आपल्या भाषेचीच साक्ष आहे. पुढच्या अडचणींचे निवारण आधींच करून ठेवणे अशा अर्थाला जो शब्द योजतात, त्याचा मूळ धात्वर्थ पाहूं गेलें तर, फक्त 'पुढील विचार करणे एवढाच आहे. परंतु हल्ली प्रचारांत त्याचा अर्थ तेवढाच समजत नसून 'त्याबद्दल तजवीज करणे' इतका व्यापक अर्थ धरतात. 'पुढील ततूंद' ह्या गुणासंबंधाने जेव्हा जेव्हां आह्मी बोलतों, तेव्हां तेव्हां त्यांत पुढील सूचना ह्मणजे पुढील तयारी हेच तत्त्व असते. खरोखर पुढील विचार मनात आणणे ह्याला कांहीं गुण ह्मणतां येणार नाही, तर पुढील ततूद करण JAY मात्र अत्त्युत्तम गुण खरा." परंतु पुष्कळ मनुष्ये पुढील ततूद करीत नाहीत. त्यांना गतगोष्टींचे सरणच नसते. ती फक्त चालत्या काळाचा मात्र विचार करित असतात. ती संग्रह ह्मणून कसला तो करीत नाहीत. ती जेवढे काही मिळवितात तेवढें सारें खर्च करून टाकतात. ती आपल्या खतःचीही पुढची तरौंद करीत नाहीत, व आपल्या कुटुंबाचीही ततूद करीत नाहीत. ती मोठा पगार मिळवितात, पण जेवढा मिळवितात तेवढा झाडून सारा खाण्यांत आणि पिण्यांत फडशा पाडून टाकतात. असले लोक सदासर्वदा दरिद्रीच असावयाचे, आणि नकाराच्या काठावर लोंबकळत रहावयाचे. राष्ट्रांची गोष्टही अशीच. जी राष्ट्र उत्पन्न केलेले सारें खाऊन फडशा पाडतात, पुढील उत्पन्नाकरितां सांठा ह्मणून कसला तो करीत नाहीत, त्यांच्या जवळ भांडवल उरत नाही. ती उधळ्या माणसांप्रमाणे जेमतेम हातातोंडाशीं गांठ घालून असतात. आणि ती नेहेमी गरिवीत आणि दुःखाकष्टांतच खितपत बसतात. ज्या राष्ट्रापाशी भां हा शब्द providence (प्राव्हिडन्स्) हा होय.