या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. डवल नसते, त्यांना व्यापारही नसतो. त्यांना ठाकठिकी राखण्यापुरती पुंजीच नसते. त्यामुळे त्यांना जहाजें नसतात; गलबतें नसतात; गोद्या नसतात; बंदरें नसतात; कालवे नसतात; आगगाड्या नसतात, कांहीं नसते. काटकसरी उद्योग हा जगाच्या सुधारणेचें मूळ आहे. स्पेनदेशाकडे पहा. तेथें अति उत्तम जमिनींत सुद्धा पीक होतें तें अतिशय थोडें होतें. ग्वाडालकीव्हरच्या किनाऱ्यावर जेथें एक वेळ १२००० शहरें नांदत होती, तेथें आतां ८०० सुद्धां उरली नाहीत. आणि आहेत त्यांत सारें भिकार भरलेले आहे. स्पेनदेशांत एक मणच चालत आली आहे. ती ही की “आकाश चांगले आहे; व पृथ्वीही चांगली आहे. पण त्या दोहोंमध्ये जेवढे आहे तेवढे मात्र वाईट!" अखंड उद्योग करावयाचा, किंवा नेटानें काम करावयाचे मटले की, ती स्प्यानिअर्ड लोकांना मोठी दुःसह गोष्ट होती. कांहीं आळस आणि काही ताठा; मिळून कामाला खाली वांकावयाला त्यांना फुरसतच सांपडत नाही. स्प्यानिअर्ड लोक काम करावयाला लाजतात, पण भीक मागावयाला लाजत नाहीत! अशा रीतीने समाजामध्ये विशेषेकरून दोन भेद झालेले आहेत. संग्रही आणि खर्चिक; पुढील ततूद करणारे, व पुढील ततूद न करणारे; काटकसरी आणि उधळे; हात राखून असणारे, व कफल्लक. जी मनुष्ये श्रम करून काटकसरी बनतात, तीच भांडवलाची धनी होतात. आणि त्याच भांडवलाच्या योगाने दुसरे श्रम सुरू होतात. भांडवलाचा सांठा त्यांच्या हातांत असल्यामुळे, ती आपल्या ऐवजी दुसया काम करणारांस काम लावून देतात. ह्याप्रमाणे व्यापारधंद्यास सुरवात होते. काटकसरी मनुष्य घरे बांधतो; वखारी घालतो, गिरण्या उभारतो; ते हत्यारांचे व यंत्रांचे कारखाने काढतात; ते तारवें बांधून ती जगाच्या निरनिराळ्या भागांवर पाठवितात. ते आपले भांडवल एकत्र करून लोखंडी सडका, बंदरें, गोद्या वगैरे बांधतात. ते दगडी कोळशाच्या, लोखंडाच्या व तांब्याच्या खाणी उघडतात. ते पाणी काढण्याची एंजिने सुरू करून त्यांना खच्छ ठेवितात. ते मजूरदार लोकांना खाणीच्या कामावर लावतात. अशा रीतीने नानाप्रकारचे कामधंदे उत्पन्न करीत असतात.