या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. १६१ हे सर्व काटकसरीचें फळ आहे. पैशाचा संग्रह करून तो फायदेशीर कामाकडे लावण्याचा परिणाम होय. जगाच्या ऊर्जितावस्थेमध्ये उधळ्या मनुष्याचा काहीएक वांटा नाही. तो जितके मिळवितो तितकें खर्च करतो, ह्मणून त्याच्याने कोणास कांहींच मदत होत नाही. तो कितीही पैसा मिळवो, कोणत्याही त-हेने त्याला सुस्थिति यावयाची नाही. त्याला आपल्या उत्पन्नाची व्यवस्थाच लावतां येत नाही. सदान्कदा दुसऱ्यापाशी याचना करीत रहावयाचें. खरोखर काटकसरी लोकांचा तो दास व गुलाम ह्मणूनच जन्मास आलेला असतो. पुस्तकपरीक्षा. दहा व्याख्यानें:-श्रीमत्स्वामी हंसस्वरूप योगिराज महात्मे, ह्यांची खारी सन १९०० सालामध्ये बडोदें शहरी आली होती, व त्यांनी तेथें “सनातन वैदिक धर्मा-" वर, ही 'दहा व्याख्याने देण्याचा अनुग्रह केला. ही व्याख्यान 'हिंदुस्थानी भाषेत होती. ती ठिकठिकाणच्या लोकांस ऐकावयास मिळाली नाहीत. त्यांनी वर्तमानपत्रांतून वगैरे कानाने त्यांचे काय श्रवण केले असेल, तेवढेच ! तेव्हां ती समग्र वाचण्याविषयी सर्वांसच उत्कंठा असणे स्वाभाविक आहे. हे सर्वे जाणून वे० शा० सं० भास्कर राजारामशास्त्री जोशी. व रा. रा. दत्तात्रय रावजी पळसीकर ह्यांनी अत्यंत मेहनतीने ती सर्व ज्या वेळची त्या वेळी टांचून घेऊन, मराठींत उतरली, व मेसर्स दामोदर सावळाराम आणि मंडळीनें ती छापून प्रसिद्ध केली. ह्याबद्दल मराठी वाचकांनी त्यांचे खरोखरीच फार आभार मानले पाहिजेत. ह्या गृहस्थांनी जर इतके परिश्रम घेतले नसते, तर एवढा लाभ खरोखरच आह्मांस झाला नसता. सदहूं पुस्तक सुप्पर रॉयल अष्टपत्री सांचाच्या सुमारे १०० पृष्ठांचे झाले आहे; व त्याची किंमत १२ आणे, हीही बेताचीच आहे. आरंभी योगिराजांचे सुंदर कोरीव चित्र दिले आहे. शिवाय, त्यांचे थोडेसें उपलब्ध झालेलें चरित्रही त्यास जोडले आहे. त्यावरून, असे समजते की हे स्वामी मूळचे चांगले श्रीमान् असून, त्यांची मातापितरें, त्यांच्या बालदशेतच निवर्तली; तेव्हां त्यांच्या कोणी जवळच्याच इष्टआप्तांनी त्यांची जिनगी सांभाळून, त्यांचे पालनपोषण केले आणि ते वयांत आल्यावर त्यांस, लग्न करून, प्रपंच करण्याविषयी व आपली जिनगी हातांत घेण्याविषयी ते आग्रह