या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. करूं लागले. परंतु स्वामींचा कल लहानपणापासूनच परमार्थाकडे वळला होता. ह्यास्तव ते संसारसुखाच्या भानगडीत न पडतां, तपश्चर्येकरितां हिमालयपर्वतांत गेले. आणि तेथून सद्गुरूंच्या उपदेशाने पावन होत्साते, देशपर्यटन करीत करीत नेपाळास गेले. तेथे काही संतमंडळाच्या विचाराने ते धर्मप्रसार करण्याच्या खटपटीस लागले. पुढे ते दरभंग्यास आले, तेव्हां दरभंग्याच्या महाराजांनी त्यांची भेट घेऊन सर्व उपदेश ऐकून घेतला. आणि सनातन धर्मप्रसारक सभा स्थापन करण्याकरितां त्यांनी "कमतौल" येथील एक आपला वाडा दिला. त्यांत स्वामींनी 'भारत त्रिकुटिमहल" ह्मणून संस्था स्थापन केली, व तसाच अन्यत्र धर्मप्रसार करण्याकरितां ते यत्न करीत आहेत. बडोदें येथे त्यांनी: १ सनातन धर्माची महती. २ ब्रह्मविद्येशी संध्येचा संबंध, ३ अहिंसा. ४ संध्येच्या द्वारा आयुष्याची वृद्धि. ५ संध्येच्या द्वारा सुख व मोक्ष यांची प्राप्ति. ६ पुनर्जन्म. ७ संध्येच्या द्वारा आरोग्याची वद्धिति ८ प्रतिमापूजन.. ९ श्राद्ध. १० रामनामाचा महिमा. अशा दहा विषयांवर अस्खलित व्याख्याने दिली. स्वामींची वाणी अस्खलित व भाषण आवेशयुक्त दिसते. स्वामींची चर्या दिसण्यांत मोठी गंभीर आहे. "शतपट बोलून दाखविण्यापेक्षा, एकपट करून दाखविण्याची किंमत, हजारों पट अधिक आहे,” ह्या चीनदेशांतील ह्मणीप्रमाणे, स्वामींच्या भाषणांतील मुद्दे कसेही असोत, त्यांजवर लोक कितीही आक्षेप घेवोत, तरी त्यांच्या भाषणाची किंमत फार मोठी आहे. कारण, त्यांनी सर्वसंगपरित्याग केलेला आहे; त्यांच्या अंगी इंद्रियदमनशक्ति जागरूक आहे; त्यांनी आपले सर्व आयुष्य परोपकारार्थ खर्च केले आहे; केवळ धर्मप्रसाराकरितांच त्यांनी आपला सारा जीव वाहिला आहे; जनहित साधण्याकरितां त्यांनी आपल्या सर्व सुखावर पाणी सोडले आहे; लोकांची दैन्यावस्था पाहून त्यांच्या आंतड्यांस पीळ पडला, आहे; लोकांच्या कळवळ्यास्तव त्यांनी आपल्या स्वार्थास तिळांजळी दिली