या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. आहे; तेव्हां त्यांची योग्यता काय सांगावी ? त्यांच्या सुखांतून चार शब्द निघाले, व ते कर्णावर पडले, तरी तें अमृतच समजले पाहिजे. मनुष्य जितका जितका अधिक वजनदार-अर्थात् हाताने क्रिया करून दाखविणारा असतो, तितका तितका त्याचा परिणाम त्याच्या शब्दांचा ठसा-जनांच्या अंतःकरणात अधिक खोल शिरतो. ह्मणूनच स्वामींचे व्याख्यान श्रवण करण्यास लोकाचा इतकी गर्दी होत असे. असो. आतां, व्याख्यानांसंबंधाने थोडासा विचार करूं. ह्या व्याख्यानाच्या सबधानें प्रथम ही एक गोष्ट लक्ष्यात ठेविली पाहिजे की, ती मूळची हिंदुस्थानात होती; आणि सांप्रत ती मराठीत केलेली आहेत. तेव्हां त्यांत फारसा नसला तरी, थोडाबहुत कमजास्तपणा येणे शक्य आहे. तरी मुद्दे सुटलेले नसतील, हे उघडच आहे. प्रत्येक व्याख्यानामध्ये पूर्वार्ध, उत्तरार्ध, असे दोन भाग असून, पूर्वार्धात विषयप्रतिपादन, व उत्तरार्धात एक दृष्टांतपर साधुसंताची कथा; तसेंच, आरंभी संस्कृत श्लोकानें, श्रुतीनें, किंवा उपनिषदान इश्वराच नमन व स्तवन, प्रस्तावनेदाखल एक रूपक, व थोडेसें भजन, असा वामाना याख्यानाचा क्रम धरिला आहे. स्वामींचे प्रतिपादन कांहींसें जुन्या धतीवर आहे. अर्वाचीन मतवाद्यांच्या मुखास स्वामी विवेकानंदांच्या 'स्टॉपर' प्रमाण, तें तुस्त होण्यासारखें नाही. तरी त्यांत पुष्कळ गोष्टी नवीन व विचार करण्यासारख्या आहेत. पहिल्या व्याख्यानांत संस्कृत भाषेची महती, परभाषेतील कित्येक शब्दांशी तिचे साम्य, वगैरे सांगून शेवटी तुलसीदासाची गोष्ट सांगितली आहे; दुसऱ्या व्याख्यानांत, वर्णविशेषांची स्थिति, आत्मस्वरूपाचा विसर; देहस्थ चक्रांची माहिती; प्राणाचे स्वरूप, प्राणायामाचे महत्व, इत्यादि सांगून शेवटी मयूरध्वजाची कथा सांगितली आहे. तिसरे व्याख्यान अहिंसेबद्दल असून, त्यांत बरीच साधार माहिती दिली आहे; पुनर्जन्म व श्राद्ध ह्या विषयांच्या प्रतिपादनांत झणण्यासारखे महत्वाचे मुद्दे नाहीत. "कित्येक लोक 'परीस' हा पदार्थ मुळीच अस्तित्वात नाही, असे समजतात; परंतु तें खरें नाहीं. नेपाळ येथील श्रीपशुपतीची मूर्ति परिसाची आहे. व तिच्या संसर्गाने लोहाचे सुवर्ण बनतें, असें पुष्कळांच्या पाहण्यांत आले आहे. दरसाल तेथे थोडेसे सोने तयार करून, व त्यावर अमुक सालचे सोने अशी अक्षरें नमूद करून ते राजसंग्रही ठेवतात."