या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. हे प्रतिपादन केवळ संदिग्ध होय. सोने होते, मग थोडेंच कां करितात ? इत्यादि अनेक शंका राहतात. ह्याकरितां त्यावर अधिक प्रतिपादन पाहिजे होते. कोणाच्याही रामनामाचा महिमा तर कोणीकडच्या कोणीकडेच वहावत सुटला आहे. नांवाच्या अक्षरांतील संख्येस ४ नीं गुणावें; त्यांत ५ मिळवावे; त्यांची दुप्पट करावी; आणि नंतर त्यास ८ नी भागावें, ह्मणजे नेहमी दोनच शिलक राहतात. आणि दोन ह्मणजे काय ? तर 'रा' व 'म' ही अक्षरें! ही केवळ पोरफटवणी होय. असे कितीएक विचार वादग्रस्त आढळतात. तथापि स्वामी हे खरे खरे विरक्त आहेत; ते विद्वान् आहेत; त्यांचे कितीएक विचार अत्यंत ग्राह्य आहेत; ते बहुश्रुत आहेत; धर्माविषयी त्यांच्या मनांत खरी खरी आस्था आहे; आणि त्यांच्या कित्येक व्याख्यानांतील माहितीही फार उपयोगाची आहे. ह्यास्तव त्यांच्या वचनामृताचा लाभ, रसिक जनांनी, धर्माभिमान्यांनी, व जिज्ञासूंनी एकवार तरी अवश्य घ्यावा, अशी आमची शिफारस आहे. येवढे सांगून, श्रीहंसस्वरूप स्वामींच्या ह्या अनुपमेय अनुग्रहाबद्दल व त्यांच्या व्याख्यानांचा लाभ करून देणाऱ्या प्रयत्नशील मंडळीबद्दल फार फार आभार मानून दुसऱ्या विषयाकडे वळतो. पत्रव्यवहार. ब्राह्मण-आर्या ब्राह्मण ह्मणवायाला मनांत मज फार वाटते लाज। सूर्याच्या तेजाचे कधीतरी करिल काजवा काज ॥ १॥ वल्कल-वस्त्रे, माला रुद्राक्षांच्या, शिरी जटा-भार । शय्या असे तृणाची, निर्जन वनवास, तो फलाहार ॥ २ ॥ व्याकरण, न्याय, ज्योतिष, गायन, वादन, तशा मिमांसा हो । प्रत्यक्ष त्यांस पाहुनि विचार-गंगा मनांत ती वाहो ॥ ३ ॥ रात्रं-दिन शास्त्रांचा करुनी त्यांनी विचार साचार । केले ग्रंथ, तयांनी तत्त्व-विचारीहि तोषले फार ॥ ४ ॥ घडिपुला कधिं न मिळे विज्ञान-विचार-मानसीं स्थान । चारी आश्रम पाळिति, ब्रह्मीं धरिती सदैव तें ध्यान ॥ ५ ॥