या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. योगी योगें मिळविति परमेश-स्थान सौख्य-दायक जें आयुष्य फार वाढे, शांत असति सम-गुण-तम-सत्त्व-रजें ॥ ६ ॥ सर्वहि शास्त्री ज्यांनी पूर्णत्वी पूर्ण काल घालविला । ज्यांचा कीर्ति-ध्वज हा सगळ्या सृष्टीमधेहि फडफडला ॥ ७ ॥ शारिर-मानसिक-सुखी ज्यांनी अल्पहि न ठेविलें लक्ष । अध्यात्मी, सुविचारी ज्यांचे मानस सदा असे दक्ष ॥ ८ ॥ वाल्मिक, वसिष्ठ, भास्कर, पाणिनि, वाग्भट्ट, कालिदास असे । अन्य तसे धन्य पुरुष, ज्यांचा बहु-कीर्ति-रूप-काय वसे ॥ ९ ॥ एकांत जी ठिकाणे, गंगा, गोदा, अनेक गिरि असती । ती त्यां बहु आवडती, असती चिन्हें तयांस दाखविती ॥ १० ॥ अध्ययनाध्यापन हे कर्तव्यचि समजुनी सदा करिती । ज्ञानोदधि दुस्तर जरि मति-नौकेनें क्षणैक ते तरती ॥ ११ ॥ शतकें अनेक झाली, परि ज्यांचा धर्म आजवरि टिकला । त्यांचे वंशज, ज्यांनी पोटाला सर्व देह हा विकला ॥ १२ ॥ भांडार असे सगळे गीर्वाणी, त्यास आझि बहु मुकलों । पोटाला पर-भाषा शिकतों, स्वत्त्वाभिमानही चुकलों ॥ १३ ॥ ऐशी अमची जननी तिजसी आह्मी अनोळखी झालों। आह्मां काय ह्मणावें ! तद्वंशी व्यर्थ आहि हो आलों ॥ १४ ॥ या मन-भूवर वर्षे पर-भाषा-नीति-धर्म-पाऊस । संस्कार-वश-मनाने आत्म-पर पहावया न हाऊस ॥ १५ ॥ आस-गणी नावड ज्या, गिरि-कंदर-वास गोड ज्या लागे । सर्वां भूतीं एकचि, स्व-पर न ज्यांच्या मनीं कधीं वागे ॥ १६ ॥ अंतःकरण कसे तें, आत्मा अ-क्षय्य, जन्म हा घेतो। सप्रमाण सिद्ध केलें, ज्ञानाक्षांनी विचार पाहे तो ॥ १७॥ योगें तात्त्विक समजे, ब्रह्मीं आत्मा सुखी सदा राहे । प्राणायाम तयाची खूण, न कोणी विचार तो पाहे ॥ १८ ॥ आहों किती पराधिन माहित नाहिंत स्व-धर्म-तवें हो मंत्र न ये आझाला, अर्था जाणावया न इच्छा हो ॥ १९ ॥ मुंज असे ही अपली अध्ययनाचीच पायरी पहिली। केवळ व्यवहार असे, खर्चाची प्रथम पायरी धरिली ॥ २० ॥