या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २८१ हैं सुद्धा आह्मांस पाश्चात्यांनी दाखवून दिले पाहिजे. तेव्हांच ते आमचे वडील असे समजून आली त्यांच्या पायांवर मस्तक ठेवू. येरवीं, घटके घटकेला जरी ते आमच्या पायांस लाथळले, तरी त्यांचा आह्मांस विधिनिषेध नाही, किंवा ओळख नाही. मोक्षमुल्लरासारख्या तमसा नदीतीरस्थ गौरकाय आचार्यांनी तपेंच्या तपें वेदाचें अध्ययन करून त्यांतील रहस्यांचा कंठशोष करावा, तेव्हां ती आमांस समजावयाची; ब्लाव्हाटस्की, ऑनि बिझांट सारख्या 'पाताळस्थ नागकन्यांनी' अवतार घेऊन येऊन 'तुमचा धर्म थोर' ह्मणून जेव्हां आमच्या कानींकपाळी आरडावें तेव्हां आझांस त्याची महती कळावयाची; श्रीमद्विवेकानंदा. सारख्या महात्म्याने पातालभुवनांत व मेरुप्रदेशांत आपल्या योगमार्गाची महती गाऊन परदेशीयांनी मान डोलविल्यानंतर आझी त्याचा विचार करूं लागावयाचें; असा 'दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याचा' आमचा स्वभावच बनून गेला आहे. मग ग्रंथांच्या संबंधांत तरी तो कमी प्रमाणाने कां असावा? ता कमी नाही, येवढेच नव्हे, तर उलट कांकणभर अधिकच आहे. ह्याची उत्तम साक्ष, व मौजेचा मासला पाहिजे असेल तर, मराठी भाषेतील 'वेताळपंचविशी' ग्रंथाची प्रस्तावना वाचावी ह्मणजे बस्स . ह्या प्रस्तावनेत ग्रंथकार त्या ग्रंथाच्या जन्मांतरांची कथा अशी सांगतात:-"हा मूळ ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. तींतून तो आरबी भाषेत गेला. नंतर पर्शियनभाषेत त्याचे भाषांतर झाले होते.त्यावरून फलाण्या फलाण्या गृहस्थांनी फलाण्या वर्षी इंग्रजी भाषेत त्याचे भाषांतर केलें. त्यावरून हा मराठी तर्जुमा केला आहे. ! !” झणजे घरांतील आजीबाईची ओळख करून घेण्यास विलायतेहून ब्यारिस्टर बोलावणे, किंवा कलकत्त्यांतील तारमास्तराने आपल्याच ऑफिसांतील 'डाउन' लाइनचा दुसरा मास्तर निद्रासुखाचा अनुभव घेत आहे ह्मणून चीन, न्यूयार्क, लंडन, मुंबई ह्या मार्गाने पृथ्वीप्रदक्षणा करवून विद्युद्धंटानादाने त्यास जागृत करण्याप्रमाणेच हा द्राविडी प्राणायाम नव्हे काय ? किंवा दशाश्वमेध घांटावर राहून पायऱ्या उतरून जाण्याच्या श्रमाकरितां, एखादा, पवित्र भागीरथीच्या प्रवाहाचे निर्मल जलपान सोडून, म्युनिसिप्यालिटीने आणलेल्या नळाचे, आरोग्यसंरक्षक जलसेवन करूं लागला तर ते कृत्य कितीसें समंजसपणाचे होईल ? असे केल्यांत उसासाचा गाळ, नळांतील शेवाळ, तुरटीचा गंध, आणि गोवापावडरचे सत्त्व ह्यांचा कषाय मात्र पोटांत जाऊन कायमचा वतनदार होऊन बसावयाचा! असो. वरच्या सर्व प्रतिपादनावरून ही गोष्ट लक्ष्यांत येऊन चुकलीच असेल की,