या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १९०१. उज्ज्वल शांत जलौध सुनिर्मल तेजपयोनिधि तरणी ॥ तिमिरागमन व्योमी द्विजगण विशाल तरुवर रानीं ॥ ३ ॥ नरनारींचे समूह सुमनाच्छादित सुंदर वेली ॥ नीरांतर्गत जलचरलीला बघुनी सायंकाली ॥४॥ उद्भवले जे सुचुनि मानसीं विचार त्यांतिल कांहीं ॥1 कवनी वर्णन करुनि धाडिले तुज सन्निध ते पाहीं ॥ ५ ॥ शोधुनि गमले पसंत तरि मग वसंतऋतुंतचि बसुनी ॥ प्रीतितरूवरि कोकिळराया गा ते सुस्वर गानीं ॥ ६ ॥ सायंकाली पश्चिमभागी रक्तवर्ण नभ दिसतें ॥ मेघपंक्ति त्यामधिं तेजोमय बधुनि मनाला गमतें ॥ ७ ॥ की जग प्रभु दत्ताचा मुख्य प्रधान सविता ॥ आला इकडे झणुनी त्याचे स्वागत करण्याकरितां ॥८॥ सुवर्णवर्णे वर्गस्थांच्या सुंदर भाषेमधुनी ॥ सूर्यो जयतु स्वागतोसि बहु येणेंपरिचे लिहुनी ॥ ९॥ जागोजागी रक्तपटांना पाश्चिमात्य देवांनीं ॥ आधाराविण नभी लाविले जणुं बहु चातुर्योनी ॥ १०॥ किंवा गमतें की भरजरिचा लाल शालु नेसोनी ॥ खपती रवि गृहिं येइ ह्मणुनि त्या पश्चिम पाहि नटोनी ॥ ११ ॥ इकडे प्राची दिशेस जिकडे तिकडे भूवरि नाकीं ॥ प्रदेश सर्वहि तिमिराने युत बघुनि मना गमतें कीं ॥ १२ ॥ तमदूतमुखें सवतीगृहिं पति गेला हे ऐकोनी ॥ खिन्न जाहली पूर्व दिशा ती प्रभारहित होवोनी ॥ १३ ॥ गमतें कोठे कोठे केवल रक्तवर्णनभ बघुनी ॥ विलंब केला प्रिय भर्त्याने मंदिर येण्या ह्मणुनी ॥ १४ ॥ न बोलण्याचा कांहिं काल निजपतिसह निश्चय करुनी ॥ को होउनि लाल पाहि त्या पश्चिम दिशा रुसोनी ॥ १५ ॥ काही कालानंतर पुढती गेला असुनिहि स्वपती ॥ स्नेहसलिलसरसविता सदनी पूर्वेसम पश्चिम ती ॥ १६ ॥ ११ सूर्य. २ आकाशांत. ३ पाण्यामधील. ४ देवांच्या. ५ पूर्वेस. ६ नुसतें. ७ पाणी. ८ सरोवर.