या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. प्रभारहित बहु खिन्न पाहुनी विस्मय वाटे चित्तीं ॥ कारण याचे शोधाया मग सुकविकल्पनादूती ॥ १७ ॥ पाठविली ती कामशरासम गेली त्वरा करोनी ॥ क्षणार्धात मग परतुनि आली खरें वृत्त समजोनी ॥ १८ ॥ ती वदली की रुसुनि बैसली होती पश्चिम ह्मणुनी ॥ रविनें केले प्रयत्न बहु ती वश करण्यास्तव रमणी ॥ १९ ॥ परि वश होइल शीघ्र न भामिनि करुनी अशा विचारा॥ स्वामीसेवेमध्ये क्षणभरि विलंब नच करणारा ॥ २० ॥ प्रभुपदि ठेवुनि लक्ष दक्ष जो निज कार्यों असणारा ॥ तिला त्यजुनियां गेला देउनि न स्त्रीमोहा थारा ॥ २१ ॥ हाणुनी प्राची दिशेसमान प्रभारहित होवोनी ॥ दिसू लागली आहे आतां उदास पश्चिम तरुणी ॥ २२ ॥ इकडे उद्यानामधिं शीतल मंद पवन वाहे तो ॥ पुष्पगुच्छयुत लता डुलति त्या बघुनि भास मनि होतो ॥ २३ ॥ की अधिकारी वरिष्ठ अपुला सविता येवुनि त्याने ॥ "उत्तम करितां काम आपुलें तुझी" असे प्रेमानें ॥ २४ ॥ कथिले, झाले प्रेत्यवेक्षण प्रैमाद घडुनि न ह्मणुनी ॥ आनंदातें व्यक्त कराया निज मित्रा घेवोनी ॥ २५ ॥ वारयोषितापुष्पलतांच्या नृत्यातें करवूनी ॥ विहार करि जणुं पवन सुखाच्या गोष्टी बहु बोलूनी ॥ २६ ॥ दिसतो तरुवर शीतल पवनें पीडित होउनि कामें ॥ अपुली सुंदरि पुष्पमंजरी करिं धरितांना प्रेमें ॥ २७ ॥ नीरांतर्गत देह ठेवुनी काढुनि वक्रा वरती ॥ नक भयंकर मंदगतीने डोही शिरतां दिसती ॥ २८॥ कोठे ज्ञानी द्विज करितांना संध्या दृष्टिस पडती ॥ कोठे मोहें अज्ञान द्विजे गृहिं शिरतांना दिसती ॥ २९ ।। वक्रगतीची चापल्याची मत्स्यांची जलकेली ॥ नदीतटाकी पाहुनि होई सुख बहु सायंकाली ॥ ३० ॥ १ कोपयुक्त स्त्री. २ परीक्षण (इन्स्पेक्षन). ३ चूक. ४ मगर. ५ पक्षी. ६ जलक्रीडा. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at Javah DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.