या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु०१५] पु [अं०८ सजीव बुधला! प्राणिशास्त्रवेत्त्यांनी सूक्ष्मावलोकनाने मुंग्यांबद्दल जी निरानराळा वर्णने लिहून ठेवलेली आहेत, त्यांवरून त्यांच्या सर्व कृति मनुष्यप्राण्याच्या तोडीच्या असतात असे सिद्ध झाले आहे. आपल्यामध्ये जसा घरप्रपंच, समाज, घरदार व राष्ट्र इत्यादि व्यवहार आहे, त्याचप्रमाणे त्याच्यांतही आहे. कित्येक मुंग्या दुबळ्या राष्ट्रावर हल्ला करून तेथून अनक मुंग्या पाडाव करून आणतात. त्यांपैकी कित्येकांची सरशहा कत्तल करतात, व कित्येकांस गुलाम करून त्यांच्याकडून मरेमरेतों काम घेतात. अशा प्रकारच्या मुंग्या ह्मणजे त्यांच्यांतील शूरवीर, राजे, सरदार किंवा गर्भश्रीमंत होत. त्या सर्वखी, गुलाम मुंग्यांवरच अवलंबून राहतात. गुलामांशिवाय त्यांना कोणताच व्यवहार चालवितां येत नाही. मुंग्यांच्या रीतिभाती व चालचलणूक ही ज्यांनी ज्यांनी लक्ष्यपूर्वक अवलोकन केली आहेत, ते ते असें ह्मणतात की, ह्या दोन जातींच्या मुंग्यांमधील वागणुकीत मोठा चमत्कारिक भेद आहे. धनी असतो तो