या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०१.

  • आणलेलापा थर देता लावून त

एक एक झाडाचे पान छत्रासारखें धरून चाललेले दृष्टीस पडतात. ही पार्ने इमारतीच्या कामास लावतात, व ती काही विलक्षण रीतीने | जोडतात. त्यांच्या घरट्याचा-वारुळाचा-पुष्कळ भाग, साऱ्या बोगद्यासुद्धा जमिनीच्या खाली असतो. तरी थोडासा भाग जमिनीच्यावरही आलला असतो. जो भाग वर आलेला असतो, ती त्यांची मेघडंबरी असत. तिची उंची दोन फुटांवर क्वचित्च आढळण्यांत येते. तिचा व्यास मात्र चार फुटींपर्यंत असतो! घुमटाचा आकार पाने लावून तयार केलेला असतो, व त्यावर पातळसा मातीचा थर देतात. काम करणाच्या मुंग्या असतात त्या आपण आणलेली पाने लागलीच बांधीत नाहीत, तर ती तशीच ठेवतात आणि दुसरी आणावयास जातात. कारण ह्या मुंग्या झणजे शुद्ध मजूर होत. गवंडी मुंग्या ह्मणून वेगळ्याच असतात. त्या येऊन ती मजुरांनी आणून ठेवलेली पाने नीटटकी बांधून थरावर थर बसवितात. काहीं मुंग्या गवळी असतात. त्या एका जातीच्या किड्यापासून दूध वगैरे काढून गवळ्याचा धंदा करतात. केरळकोकिळ (पु. १४ अं. ३) मध्ये मुंग्यांच्या गायीचे चित्र व वर्णन आलेले वाचकांच्या सरणात असेलच. ह्या गायी ह्मणजे एका जातीचे पायांचे गुडघे पाठावर काढलेले व झाडाशी चिकटून राहिलेले किडे असतात. ह्या किज्याच्या आंगामध्ये एक जातीचा गोड रस भरलेला असतो. त्याला दुग्धरस' असें ह्मणतात, तो ह्या मुंग्या काढून घेतात. दुसऱ्या एका जातीच्या मुंग्या आहेत त्या सुगीच्या दिवसांमध्ये निरनिराळी बीजें गोळा करतात. आणि ती आपल्या जमिनीमध्ये अ. सलेल्या कोठारांत साठवून ठेवतात. ह्यांची वारुळे अतिशय खोल गेलेली असतात. कधी कधी तर ती खडकाळ जमिनीतूनही पार गेलेली असून त्यांच्या आंत कोठारें बांधलेली असतात. ही कोठारें एखाद्या गृहस्थाच्या खिशांतील घड्याळायेवढी मोठी असतात. सुगींतील मुंग्या असतात त्या, धान्याच्या विशेष जातीप्रमाणे विशेष प्रकारच्या असतात. ह्या मुंग्यांची एका गृहस्थाने एकदां एक गंमत केली. हा मनुष्य त्यांच्या चालीरीती पहात बसला असता, त्याने