या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. त्यांच्या मार्गावर पुष्कळ पोतीचे मणी पसरून ठेवले. प्रथमतः ते मणीह्मणजे पोत-धान्याचेच दाणे आहेत असे समजून त्यांपैकी काहीं त्यांनी आपल्या घरट्यांत नेले. पण पुढे लौकरच त्यांची चूक त्यांना उमगली, व फिरून त्या मण्यांस त्या शिवल्या नाहीत. प्राचीनकालीं अशी समज होती की, मध उत्पन्न करणाऱ्या काय त्या फक्त मधमाशाच आहेत. दुसऱ्या एखाद्या प्राण्यापासून मध उत्पन्न होईल असे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. पण आतां असा शोध लागला आहे की, मुंग्या सुद्धां मध उत्पन्न करतात. मध उत्पन्न करतात येवढेच नव्हे, तर तो एका विलक्षण रीतीने सांठवूनही पण ठेवतात. कांहीं कामकरी मुंग्या ह्या कामाकरितां वेगळ्याच निवडलेल्या असतात. आणि मग इतर मुंग्या त्यांच्या शरिरांतील मध सदासर्वदां खात बसतात. हा मध त्यांच्या शरिरांत असल्यामुळे त्यांचे आंग इतके तट्ट फुगतें कीं सांगतां सोय नाही. तें रबराच्या फुगलेल्या फुग्याप्रमाणे निळनिवा करित असते. हे त्यांचे प्रचंड शरीर वरील चित्रांत दाखविलेच आहे. ह्या मधुपिपीलिका ह्मणजे मध ठेवण्याचे सजीव बुधलेच समजले पाहिजेत. ह्मणून आमीही त्यांस हेच नांव दिले आहे. इतर मुंग्यांना भूक लागली झणजे ह्यांच्यांतील मध खावयास सांपडतो. ह्या मधुपिपीलिकांचा अतिशय मोठा भरणा झटला ह्मणजे मेक्सिकोमध्ये आहे. एक एका मधुपिपीलिकेमध्ये किती मध भरलेला असतो, हे वरील चित्रावरून सहज लक्ष्यांत येण्यासारखे आहे. तेव्हां इतका मध, लोभाविष्ट मनुष्यप्राणी फुकट जाऊ देणार थोडाच! त्या मधासाठी तद्देशीय लोक त्या मधुसंग्राहक मुंग्या धरून जमा करतात, आणि बाजारांत त्यांचे माप घालून पैसा करतात. ह्या मुंग्यांतील मधाचा मुख्य उपयोग मटला ह्मणजे, एक प्रकारच्या दारूंत तो घालतात. हा मध त्या मुंग्यांतून काढण्यासाठी एक प्रकारचे चरक केलेले असतात. तो धंदा करणारे लोक प्रत्यही ह्या मुंग्यांनी भरलेल्या पांट्यांच्या पांट्या चरकांत ओततात, आणि पिपेंच्या पि मध भरून त्याची विक्री करून शेकडों रुपये पैदास करतात!