या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०१. १७३ चोरावर मेहरबानी! चोरी करणे हा जरी दुर्गुण आहे, तरी ती करावयासही मोठे कोशल्य व मनाला एक प्रकारचे धारिष्ट किंवा साहस लागत असते. अस्सल चौर्यकर्म करणारे, किंवा पक्के दरवडेखोर असतात, त्यांची चरित्रे पाहिलीं ह्मणजे ही गोष्ट सहज लक्ष्यांत येण्यासारखी आहे. असे जे कोणी कुशल व धारिष्टवान् चोर असतात, त्यांच्यावर राजे लोकांनी कित्येक वेळां शिक्षा न देतां क्षमा केल्याची, नव्हे, बक्षीस दिल्याची सुद्धां उदाहरणे आहेत. त्याच त-हेचे एक उदाहरण इंग्लंदच्या एका राजाच्या कारकीर्दीत घडल्याचे नमद आहे. तें आज येथे सांगाववयाचे आहे. राजा मटला की तो श्रीमंत असावयाचा, व त्याच्या संग्रहास जडजवाहीर-रत्नखचित अलंकारभूषणेही असावयाचींच; व त्याच्या सरक्षणाचा बंदोबस्तही तसाच कडेकोट असावयाचा हे उघड आहे. त्याचप्रमाणे राजा जितका जितका मोठा, वैभवशाली व बलाढ्य असता, तितका तितका त्याच्या संग्रहीं अप्रतिम रत्नसंग्रह असतो. इग्लदर राष्ट्र केवढे मोठे आहे. व तेथील सिंहासनस्थ राजे किती वैभवशाला आहत, ह्याची कल्पना हल्लीच्या बादशहांवरून व पूर्वीच्या चक्रवातनी महाराणीसाहेबांवरून बरीच होण्यासारखी आहे. तेव्हां त्या राजवाड्यांतील जवाहीरखाना किती मूल्यवान् असेल हे सांगण नकाच. राजदूषणामध्ये सर्वात उंचे भूषण मटले ह्मणजे राजमुकुट होय. कारण राजसंग्रहीं अप्रतिम ह्मणन जी जी रत्ने असतात, ती ती त्याजवरच बसावलली असतात. प्रत्येक राजवाड्यांत राज्याच्या ऐपतीप्रमाणे जवाहारखाना हा असतोच; व तो पहाण्याकरितां नेहेमीं खेड्यापाज्याच लोक, दूरदूरचे सभ्य गृहस्थ येत असतात. आणि तो सवीच्या दृष्टीस पडावा ह्मणून दाखविण्याची व्यवस्थाही सरकारांतून केलेली अ. सत. तथापि तेथे सक्तीचा पहारा असतो, हे काही वेगळे सांगावयास नको. अशा ठिकाणांतून राजमुकुटासारखी वस्तु चोरून न्याचयाची मणजे कांहीं सामान्य धारिष्टाचे काम नव्हे. असे असतांही इंग्लंदच्या दरबारी लंडनसारख्या भक्कम किल्यांतून एका गृहस्थाने