या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. राजभांडार लुटण्याचा प्रयत्न केला, व तो बहुतेक साधला, ही किती आश्चर्याची गोष्ट ? हा डल्ला मारण्याच्या कामांत जो गृहस्थ पुढारी होता, त्याचे नांव कर्नल ब्लड् असे होते. हा मनुष्य केवळ उलट्या काळजाचा होता. त्याने ह्यापूर्वीही अनेक वेळां अनेक ठिकाणी असेच डल्ले मारले होते. एक वेळ तर ह्या राजेश्रींनी आपले साथीदार घेऊन आयलँडचा लेफ्टनंट लार्ड ड्यूक ऑफ आरमंड ह्यांच्या येथेही प्रवेश केला होता. आणि त्या कामांत टायबर्नगेट येथे त्याच्या गळ्यास तात लागण्याचाच प्रसंग आला होता. परंतु मोठ्या पराकाष्ठेनें ड्यूकनें त्याचा बचाव केला, ह्मणून खैर झाली. ब्लड्. लंडनच्या किल्लयांतील राजमुकुट, राजदंड, व रत्नगोल लांबविण्याचा कसा घाट घातला ते ऐका. सांप्रत जशी लोकांस पाहण्यासाठी लंडनच्या किल्ल्यांत राजभूषणे मांडून ठेवलेली आहेत, तशीच त्या कालींही ठेवलेली होती; व ती पहाण्यास कोणांसही परवानगी मिळत असे. तेवढा फायदा घेऊन हे तस्करराज पाद्री बनून तेथों आले. पायांचा झगा मोठा लांब व पायघोळ असल्याचे आमच्या वाचकांस माहित असेलच. ह्या पाद्रीबुवांनी येतांना एक स्त्रीही हाती धरून आणली होती. ह्या राजकीय जवाहीरखान्यावर जो रखवालदार होता, त्याचे नांव एडवर्ड. हा आपल्या नेहेमींच्या पद्धतीप्रमाणे ह्या नव्या जोडप्याबरोबर राजाची अलंकारभूषणे वगैरे दाखवित फिरूं लागला. इतक्यांत त्या बरोबरच्या बाईनें एकाएकी घेरी येऊन पडल्याचे सोंग केले, व अगदीं घायाळ होऊन पडली. तेव्हां रखवाल. दाराने तिच्या शुश्रूषेकरितां आपल्या बायकोला हाक मारून आणले. तिने तीस उचलून आपल्या राहत्या जागेत नेले, आणि फार ममतेने तीस सावध वगैरे केली. ह्या गोष्टीस बरेच दिवस लोटल्यानंतर ब्लड्नें त्या एडवर्डच्या पत्नीस कांहीं उत्तमोत्तम नजराणा नेऊन दिला. त्यामुळे त्या उभयतां नवराबायकोसही मोठे उपकार वाटले, व ती त्याच्यावर लोभ करूं लागली. ह्याप्रमाणे त्यांच्याशी संधान बांधून दळणवळण ठेवण्याचा परिपाठ ठेवला. रखवालदाराला एक मुलगी होती, तिचें, हे नवे पाद्री मित्र साहेब, फारच कौतुक करीत व लाड पुरवीत. एके दिवशी गोष्टी सांगण्याच्या