या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०१. १७५ भरांत त्या मुलीला खासा छान नवरा देण्याचे कबूल केले. त्यांनी सांगितले की, माझा एक पुतण्या मोठा विद्वान् , सुखरूप व गुणी असून घरचा चांगला संपन्न आहे. ह्या मुलीचा आणि त्याचा जोडा फारच उत्तम शोभेल. त्यांनी तिच्या आईबापापाशी हेही कबूल केले की, त्या नवऱ्या मुलाला मी एके दिवशी येथे ह्या किल्लयांत घेऊन येईन. तो आपल्या पसंतीस उतरल्यास मग आपण लग्नाच्या ठरावासंबंधाने विचार करूं. मुलगी गळ्यास लागली ह्मणजे आईबापांस केवढी चिंता असते, ह्याचा अनुभव बहुतेक संसारिकांस आहेच. आणि त्याचे चित्रः"झाली ज्याची उपवर दहिता । चैन नसे त्या तापवी चिंता ह्या पदांत 'किर्लोस्कर कवींनी फारच उत्कृष्ट तन्हेनें वठवून दिले आहे. तेव्हां त्या रखवालदार जोडप्यास आनंद व्हावा, व अनायासे या घरांत चालत आलेला सुंदर नवरा मुलगा पाहण्याविषयी उत्कंठा लागावी, ह खभावसिद्धच आहे. ह्या गोष्टीस थोडे दिवस लोटल्यावर एके दिवशी सकाळीच हे राजेश्री आपल्या त्या पुतण्याला घेऊन जवाहीरखान्यांत दाखल झाले. त्यांनी आपल्याबरोबर आणखीही दोन गृहस्थ आपले स्नेही ह्मणून आणले हात. त्यांच्या बद्दल त्यांनी रखवालदारास असे सांगितले की, हे माझं मित्र असून आजच परदेशी जाणार आहेत. त्यांच्या मनांत आज जाता जातां राजवाड्यांतील जडजवाहीर पाहून जावे, असे आले ह्मणून मी त्यांस घेऊन आलो आहे. इतके ह्मणून तो लगेच ज्या दिवाणखान्यांत जडजवाहीर ठेवले होतें त्यात शिरला. तितक्यांत आपण वाट पाहत बसलेले पाहुणे आले आहेत, त्याच खागत करण्यासाठी सर्व तयारी असावी, ह्मणून रखवालदाराने आपल्या बायकोस व मुलीस घराकडे निरोप पाठविला. ब्लड्च्या टोळातील थोडेसे लोक, कांहीं तरी निमित्त काढून दरवाजापाशी उभे राहिले होते. अशा हेतूने की, प्रसंग पडल्यास इतर साथीदारांस हाक मारून इशारा द्यावा. तो रखवालदार ह्या तिघांना घेऊन जवाहीरखान्यांत शिरला न शिरला, तोंच ब्लडूनें त्याला धरून त्याच्या तोंडांत बोळा घातला. आणि तोंडांतून जर शब्द बाहेर पडेल तर प्राणास मुकशील ह्मणून त्यास धमकी दिली. पण तेवढ्याने तो ऐकेना. तो