या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. पुनरपि ओरडण्याविषयी धडपड करूं लागला. तेव्हां त्याच्या डोकीवर त्यांनी असा एक सोट्याचा तडाका दिला की, त्या तेरीमेरीसरशी तो बापडा निपचितच पडला! इतके झाल्यावर ब्लडूनें बेधडक जाऊन सरकारी मुकुट घेऊन आपल्या झग्यांतील बगलेत मारला. त्याच्या दुसऱ्या एका सोबत्याने रत्नखचित गोल घेतला, आणि तिसऱ्याने सुवर्णराजदंड लपविला. ह्या तीन जिनसा तिघांनी निरनिराळ्या घेण्याचे कारण, रखवालदाराचे कोणी इष्टमित्र चुकून तितक्यांत आंत आले तर, सर्वांस झटकर पळ काढतां यावा. अशा रीतीने सर्व जवाहीर घेऊन बाहेर पडतांच दरवाजावरील मनुष्याने खूण केली. त्या बरोबर सान्यांनी आपआपला चोरीचा माल घेऊन धूम ठोकली. ते सर्व निघून गेल्यावर रखवालदार जरा शुद्धीवर आला आणि त्याने पुन्हा ओरडाओरडीस आरंभ केला. तेव्हां त्याच्या घरांतील कित्येक मनुष्ये धावून आली. , त्यांस हा प्रकार कळतांच सारा एकच गोंधळ माजला. 'चोर ! चोर !' ह्मणून जिकडे तिकडे एकच हूल पडली. कित्येक लोक चोरांचा पाठलाग करीत त्यांच्या मागोमाग धांवले. पण तेवढ्या वेळांत चोरांनी इतका लांब बाल्या हाकला की, तेवढी कोणाची कल्पनाही चालूं नये. त्यांच्या रस्त्यावर काढाघालावयाचा पूल होता, त्याच्या पलीकडे जाईपर्यंत त्यांच्या सुदैवाने त्यांस कोणी अटकाव वगैरे केला नाही. तेथे गेल्यावर मात्र तेथील एका पहारेकऱ्याने त्यांस अटकाव केला. परंतु ब्लडने त्यावर एक पिस्तुलाची गोळी झाडून त्यास चीत केलें. आणि टावरहिलपर्यंत हे सारे चोर सुखरूप पार पडले. परंतु येथे मात्र चौकीवरील कांहीं शिपायांनी त्यांस गांठले. आणि त्या शिपायांत क्याप्टन बेक ह्मणून एक मोठा शूर शिपाई होता. त्याला तर चांगलाच संशय येऊन त्याने ब्लड्च्या कमरेला एकदम मिठी मारली, आणि झोंबाझोंबी करूं लागला. त्याने प्रथम त्याच्या जवळ असलेले पिस्तुल गच्च धरून मुकुट हिसकून बाहेर काढू लागला. त्या झटापटीत तो मोल्यवान् मुकुट चिरडून जाऊन त्याच्यावर बसविलेली अमूल्य रतें भुईवर पडून दशदिशांस पसरली। व त्यांतील कितीएक तर हरवून सुद्धा गेली. आपल्या माजी चक्रव