या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. आळसामुळे ह्मणा-अडचणीमुळे ह्मणा-किंवा इतर काही अपरिहार्य कारणामुळे ह्मणा-आझांस निदान तूर्तच्या काळी हरएक शास्त्रांच्या संबंधाने पाश्चात्यांच्या तोंडाकडे पहाण्याचा प्रसंग आला आहे, ह्यांत संदेह नाही. त्यांत इतिहासासंबंधाने तर हा प्रसंग विशेषच आहे. कारण, प्राचीनकाली इतिहासाचे खरें महत्व कळलेले नव्हते; परमार्थिक विषयांत प्रगति असल्याने ऐहिक विषयाची पर्वा नव्हती पाठांतराचे माहात्म्य कमी पडून ज्यांची कवनें त्यांच्या बरोबर लयास गेली. बादशाही कारकीर्दीपासून बखरी सुरू झाल्या पण त्यांपैकी कित्येक द्वीपांतरांस गेल्या; कित्येक बंदिशाळेत पडल्या कित्येकांची कसरींनी वाट लावली; कित्येकानी वाण्यात उदार आश्रय दिला, व कित्येकांनी आपल्या प्रभूबरोबर सहगमन केले! इतक्या वा ळधाडीतूनही ज्या बचावल्या. त्या आमच्या आळसराजाच्या मराठमाळ्यात १७५० न्शीन होऊन बसल्या! त्यांची ही उत्तर ध्रुवाची दीर्घकालिक रात्र सपून 3 तीच कोठें तांबड फुटत चालली आहे. तेव्हां अर्थातच आजपर्यत इतिहास शास्त्राची तहान आह्मांस पाश्चात्यग्रंथांनीच भागवावी लागली. आणि त्यातच पर दिलेल्या गंगोदकाच्या दृष्टांताप्रमाणे पाश्चात्य नळांतून आलेला एकदेशीय खळमळ आमच्या विद्यार्थ्यांच्या पोटांत जाऊन तो पचनींही पडला झटल तथा लल. पण हा दोष लौकरच आमच्यांतील पुष्कळांस उमगला व त्याच्या निरसनार्थ अनेक उपाय सुरू झाले. - मुसलमान लोक, आणि इंग्लिश लोक हीच आमच्या राष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासाची मुख्य द्वारे होत. बाबरसारख्या कितीएक बादशहांनी आपली आत्मचरित्रे व 'तवारिखा' आरबीभाषेत व पार्शीभाषेत लिहून ठेवल्या आहेत. त्यांचाच आधार घेऊन, परदेशीयांची प्रवासवृत्ते जमेस धरून, व त्यांत स्वानुभवांची भर घालून इंग्लिशांनी अनेक इतिहास तयार केले आहेत. ज्याची भाषा भिन्न; ज्याचे आचारविचार भिन्न; अशा राष्ट्राचा इतिहास परकीयांनी लिहिला तर त्यांत ठिकठिकाणी मतविपर्यास व हेतुविपर्यास व्हावा, हे अगदी माहजिक आहे. व त्यांत आत्मश्लाघेचे व परहीनत्वाचे दिग्दर्शन होणे, हेही मानवी स्वभावास विपरीत नाही. कसेही असले तरी इंग्रज ग्रंथकारांनी आमच्या राष्ट्राचे इतिहास परोपरीने लिहून ठेवले आहेत, ही गोष्ट काही सामान्य नव्हे. पण त्यांतला एखादा सोपासा व मनोरंजक इतिहास तरी आमच्या विद्यार्थी मंडळाच्या वाट्यास येतो काय ? छे ! नांव नको. आमच्या शाळेतला पहिला इतिहास झणजे 'मारिसकृत !' मारिसच्या इतिहासाला इतिहास झणण्या