या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

5:5मास्ट अंक ८ वा. आगष्ट १९०१. १७७ तिनी महाराणी साहेबांच्या मुकुटांत हल्ली ज्याप्रमाणे 'कोहिनूर' नांवाचें बिनमोल रत्न आहे, त्याप्रमाणे त्या काली त्या मुकुटांत एक अप्रतिम लाल होता. हा लाल क्यासटाइलच्या ब्ल्याकप्रिन्सकडून एडवर्ड राजाला नजर आलेला होता, व त्याची किंमत १०,००० पौंड होती. हा लाल ह्या लठ्ठालठ्ठींत कोठे पडला, त्याचा किती तरी दिवस पत्ता नव्हता. पण पुढे तो एका रस्ता लोटणाऱ्या बाईला सांपडला! अखेर ब्लड्चा तेथे पाडाव झाला, आणि त्याला व त्याच्या सर्व साथीदारांना त्या शिपायांनी नेऊन किल्लयामध्ये कैदेत ठेवले. हा विलक्षण चोरीचा प्रकार जेव्हां राजाच्या कानावर गेला, तेव्हां एडवर्ड राजार्न असा हुकूम दिला की, ब्लडू व ज्याने रत्नगोल खिशांत घातला होता तो असे दोघे कैदी व्हाइटहॉलमध्ये माझ्यापुढे आणून उभे करावत. त्याप्रमाणे त्या दोघांस चतुर्भुज करून पुढे आणले. परंतु चौकशीअंती त्या ब्लड्चें तें धारिष्ट व साहस आणि त्याची क्लुप्ति ऐकून राजाच्या मनावर असा कांहीं ग्रह झाला की, त्याने त्यास त्याच्या अपचाची क्षमा केली येवढेच नव्हे, तर त्याने त्यास त्याच्या व त्याच्या कुटुबाच्या उदरनिर्वाहार्थ सरकारांतून नेमणूक तोडून दिली. आणि ह तस्करराज, त्या राजाच्या अंतकालपर्यंत त्याच्या नाकातील बाल बनून राहिले होते! अशी उदाहरणे फारच विरळा घडतात ह्यांत संशय नाहा. खरी खरी क्षमा ह्मणून जी काय ह्मणतात ती हीच. रुप्याचा अद्भुत कारंजा. ज्या देशामध्ये चांदीच्या शेकडो खाणी असून चांदी केवळ पायाखालची धूळ झालेली असते, तेथे रुप्याचे जिन्नसामध्ये काही विशेष अस वाटत नाही. दक्षिण अमेरिकेंत रुप्याची अगदी रेलचेल असते. तेथच्या खयंपाकघरांतील दरोबस्त भांडींच रुप्याची असतात असे नाही, तर घोड्यांची पाणी पिण्याची बकेटे सुद्धां रुप्याची असतात. ब्रह्मदेशांतील राजाच्या पदरच्या श्वेतगजाची पाणी पिण्याची गंगाळे मप्याची आहेत येवढे ऐकूनच आश्चर्यचकित होणारे जे आमी, त्या आह्मांस या अमेरिकेतील गोष्टी खन्या सुद्धा वाटावयाच्या नाहीत. २३