या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. पण तसा प्रकार तिकडे आहे ह्यांत शंका नाही. तथापि तेथे चांदीचे पदार्थ कितीही विपुल असले तरी त्यांत कौशल्य किंवा कारागिरी ह्मणून कांहींच नसते. रोजच्या वहिवाटीची भांडी मणजे केवळ ओबडधोबड काम होय. इंग्लंडमध्ये असे एक चांदीचे अपूर्व व प्रचंड काम झालेले होते. त्याचा आकार, ठेवण व त्याच्यावरील नकास काम ह्यांचा विचार केला ह्मणजे निदान त्या देशांतील तरी तें एक अपूर्व व लोकोत्तर काम होते ह्यांत संशय नाही. त्याचा इतिहास असाः-ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांच्या मनांत अशी जिज्ञासा उत्पन्न झाली की, ईजिप्तदेशच्या बादशहाशी आपल्या राष्ट्राचा स्नेहभाव असावा. कारण, तो बादशहा मोठा राजकारस्थानी व सैन्यबलानेही भारी होता. ह्याकरितां त्या महंमदअल्ली बाहशहाला कंपनीनें नजर देण्याकरितां ह्मणून हे अतिशय कौशल्याचे अजस्र व केवळ अद्वितीय असें कारंजे तयार करविले. हे कळसूत्री कारंजे खरोखरच फार अप्रतिम होते. त्याची उंन्धी १० फुटांच्याही वर असून त्याला १०,००० औंस ह्मणजे सुमारे ७४ हंड्रेडवेट अस्सल चांदी लागली होती. त्याचे आसन किंवा बैठक चौकोनी आकाराची असून ती एका काळ्या तुळतुळीत पाषाणाची, केवळ आरशासारखें तिच्यांत तोंड दिसेल अशी तिच्यावर झिलई चढविली होती. तिचा व्यास चार फूट असून तिच्या प्रत्येक टोंकास सिंहाच्या पंजाच्या आकाराचे खूर होते. त्यांनी मधील सुरूच्या खांबाच्या आकाराचा कारंजा तोलून धरला आहे असे वाटे. वरच्या सर्व घाटाला हे खूर साजेसे केलेले होते. 19 मध्यभागी एक मोठा मनोरा सुरूच्या आकारासारखा किंवा कांहींसा गुलाबदाणीसारखा झटलें तर अधिक बरोबर कल्पना होईलउभारलेला होता. त्याचें बूड अष्टपैलू असून वर शंक्वाकृति दांडा उभारलेला दिसत असे. त्यावर सर्वांत मोठी तबकडी होती. ह्या दांड्याच्या सभोंवार व मधून मधून ओकांच्या फलपर्णीचा सुंदर गजरा वेष्टिलेला होता. त्याचे वेढे इतके सुंदर व वळणदार दिलेले होते की जणों काय नागीणच वृक्षावर चढत आहे ! वरच्या पात्रांच्या कमळा, सारख्या पाकळ्या खाली आणून अशा काहीं झोंकदार मुरडल्या होत्या