या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०१. की, तेणेकरून कारागिरांचे गुण कांही विलक्षण त-हेने व्यक्त होत. खालच्या बाजूस चार शाखा असून त्या प्रत्येकीवर एक एक तबकडी होती. ह्या शाखेवरील बारीक कुसर पाहून तर पाहणारांचा जीव अगदी थक्कच होऊन जाई. ह्या प्रत्येक तबकडीमध्ये एक एक नमुनेबाज सुरई उभी केलेली होती; व तिच्यावर सफेत रंगाच्या चांदीच्या पुष्पगुच्छांनी भरलेली एक परडी होती. तिच्यांतून मंगलसूचक फलपुप्पांनी युक्त घोस आलेले लोंबत होते. ह्या घोसांची घडण अत्यंत मनमोहक असून फारच कुशलतेने तयार केली होती. मात्र यस ही केवळ बाह्य रचना झाली. पण आंतील यांत्रिक रचना तर ह्याहूनही अद्भत होती. सर्वांच्यावर जो कळस होता, त्याच्यावर कमळाची मुकुलित कलिका होती. तींतून सारखी कारंजाची धार बाहेर पडे; व पाणी पहिल्या तबकडीत पडून त्याचे चार बाजूंनी चार फवारे होऊन ते खालच्या चार पात्रांत किंवा तबकड्यांत पडत असत. हे पाणी जोराने वर उडण्यासाठी त्याच्या पोटांत बंबासारखी यंत्रे करून लावली होती. त्यांत एक असें पात्र केले होते की, त्यांत कोठूनही हवा जाऊ नये. त्याच्यावर एक लवचिक पत्रा ठेवून त्यावर एक जड बडिद टाकले होते. त्याचा त्या पाणी भरलेल्या पात्रावर हळू हळू दाब बसून कारंजे सारखें उडत राही. त्या जोराने पाणी वर उसळले ह्मणजे वरच्या तबकडींतून खालच्या तबकड्यांत पडे, आणि तेथून पुन्हा एका खालच्या पात्रांत जमून एका नळीच्या वाटेने पुन्हा मळच्या खजिन्यांत जात असे. आणि तेथे त्यास पूर्ववत् पंपाचा जोर लागून तेच पाणी पुन्हा पुन्हा कारंजांतून वर येई. अशी अखंड धारा चालू असे. हे कारंजे एक वेळ सुरू केले झणजे ते सुमारे दोन तास चाले. नंतर पुन्हा सुमारे ७८ मिनिटें खजिन्याजवळच असलेला टांडा हालविला ह्मणजे पुन्हा जोराने सुरू होई, किंवा पाहिजे तर सारें पाणी बाहेर पडे. सहा तास सारखे गेले तर मात्र पाणी बरेच कमी होई; व त्याहून आणखी सुरू पाहिजे असे वाटल्यास खजिन्यामध्ये - नवें पाणी भरावे लागे. का खालच्या चवुतन्याच्या चार बाजूंवर इंग्लिश, टर्की, आरबी व ल्याटिन ह्या चार भाषेत येणेप्रमाणे लेख कोरलेला होताः