या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. इजिप्तदेशचे खुदावंत बादशहा महंमद अल्ली ह्यांस ईस्ट इंडिया कंपनीने हे नजर केले आहे. लंडन, सन १८४५. ह्या अद्भुत व कळसूत्री कारंजाची किंमत ७,००० पौंड असून ते करणाऱ्या कारखान्यांतील कारागीर ७ महिने सारखे खपत होते. आणि प्रत्येक नकशी व प्रत्येक घाट करण्यांत ज्यांनी त्यांनी आपले बुद्धिसर्वस्व खर्च केले आहे. पुस्तकपरीक्षा. अनंतनाथस्फूर्ति-हीत प्रतिष्ठान किंवा पैठण येथे 'श्रीमदनंतनाथ सद्गुरु ' ऊर्फ 'ब्रह्मचारी बुवा' ह्या नामेंकरून 'श्रीपरमात्मलीलाविग्रहीतनु' अवतीर्ण झाली होती. त्या 'लीलावी (3) संतावताराचा त्यांच्या भक्तां । हा 'अपार भावीलीला' समुद्र वर्णन केला आहे. प्रथम रा. रा. बापुराव विनायक बावळे वकील, नेवासेकर ह्यांची विनंती'च्या रूपाने पसरलेली छोटीशी भूमिका ओलांडल्यानंतर वेद० बळवंतराव मास्तर ह्यांनी वसविलेले 'श्रीमदनंत सद्गुरु एकनाथ' ह्यांचे चरित्ररूपी घनदाट कुंजवन लागते. त्यांतून रस्ता काढित काढित पार पडले ह्मणजे रा. रा. जी. कृ. पोष्टमास्तर, पैठण, ह्यांनी 'श्रीमदनंताष्टक' नांवाचा बांधलेला घाट पुढे येतो. त्याच्या आठ पाय-या उतरून खाली गेलें की 'श्रीमदनंताच्या' अनंतप्रसादमहासागराचे दर्शन होऊन प्रसादलहरी आंगावर येऊन आदळतात. ह्या अनुपम तीर्थप्रसादाबद्दल ग्रंथकर्त्यांचे उपकार मानून समुद्रे सर्वतीर्थानां' ह्या न्यायाने त्यांत एक दोन बुड्या देऊन त्यापासून होणारा सौख्याचा लाभ इतरांसही द्यावयाचा आहे. अनंताच्या 'अपारभावी' लीलासमुद्राचा अंत लागणे कठीण तर खरेंच, तथापि आलीकडच्या काठावरच डुंबत डुंबत शिरवेल तितकें आंत शिरून घेववतील तेवढ्या लाटा आंगावर घ्यावयाच्या व त्या कामांत खालचे पाय मात्र सुटूं नयेत येवढी खबरदारी ठेवावयाची. प्रत्येक देशाला एक एक शोक असतो. चिनाला शेतकीचा शोक आहे;