या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें, हे तत्त्व समजले की सारा परमार्थ हाती आला; परमेश्वराचे दर्शन घडलें; व मोक्षही करतलाचा मल झाला ह्मणून समजावें. पण हे तत्त्व कोणांस समजत नाही; व ते समजण्याचे त्यांना सामर्थ्यही पण नसते. ह्मणून अशा लोकांना कोणीतरी सद्गुरु लागतो. पण सद्गुरु काय वाटेवर पडलेले आहेत ? तेव्हां हे वेडावलेले गृहस्थ श्रीरामचंद्र, सीतेच्या विरहाने शोकाकुल होऊन ' हा सीते !' 'हा सीते !' ह्मणून झाडाझुडपांस आलिंगन करित सुटले होते, त्याप्रमाणे भलत्याच भ्रमांत पडून हेच 'सद्गुरु' ह्मणून त्यांची घट्ट कास धरतात. पण यःकश्चित् कांच कोणती, व रत्न कोणते, ह्याची सुद्धा पारख सामान्यबुद्धीने होत नाही, मग सद्गुरूची परीक्षा करणे झणजे काय वाटेवर पडली आहे ? ह्यामुळे पुष्कळ लोक तोंडघशी पडतात, व त्यांस अनुभव येतो तो तर विलक्षणच असतो! कित्येक गुरु तर केवळ 'लोभाची मांजरेंच' असतात. त्यांना शिष्यवर्गाने आपले सर्वस्व अर्पण केले तरी, त्यांची गर्ता ह्मणून भरतच नाही. “आणा आणा" हा त्यांचा मंत्र, आणि " द्या द्या" हा त्यांचा जप !! नेसावयाच्या कौपिनीपासून तो ब्रह्मस्व फेडण्यापर्यंत, जीर्णोद्धारापर्यंत किंवा भंडाऱ्यापर्यंत यांचे फावडे सारखें चालूच असावयाचे. कोणी रहावयाला दिलेलें घरच खमाटतो, ता. कोणी हायकोटीत फिर्याद लावतो. कोणी बाग बळकावतो, तर कोणी अंतर्ग्रहांत शिरकाव करून 'अहं कृष्णं भावयामि' 'वं राधां भावय' असा उपदेश करूं लागतो. इतक्यांत पतिराजही पक्कया गुरूचे चेले असल्यास आपला सोटा सरसावून 'मां प्रत्यक्षं अंतकं भावय' असा सिंहनाद करून गुरूंनाच मोक्ष देतात ! अक्कलकोटच्या स्वामींचे व देवमामलेदारांचे शिष्य होण्याचा तर काय मध्यंतरी ऊतच आला होता! " हा दत्त्या ! हा गाणगापूरचा जोशी ! माझ्यापुढे हात जोडून उभा होता!" काल रात्री यम्या माझ्या पायथ्याशी येऊन पाय चेपीत होता. त्याला मी अशी एक लाथ मारली की, त्यासरशी तो त्या तिकडे उडून गेला!!” इत्यादि बालिश जल्पनाही काही कमी ऐकू येत नाहीत. अशा वेडेवेडे चारांनी तो परमेश्वर हाती लागणार कसा? उलट वेड्यांचे इस्पितळ मात्र ठेवल्यासारखें यावयाचें ! कबीराने झटले आहे: बम्मन होकर पोथी बाचे, सान तरपन करता है। सबकाल सूचित रहता है, यौंक्या साहेब मिलता है ॥१॥ जोगी होकर जटा बटाये, हाल मस्तमे रहता है। दोनो हात शिरपर धरके, यौक्या साहेब मिलता है ॥२॥