या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०१. मानभाव होकर काले कपडे, दाढी मीशी मुंडता है। उलटी लकडी हातमे पकडी, योक्या साहेब मिलता है ॥ ३ ॥ मुल्ला होकर बांग पुकारे, ओक्या साहेब बहिरा है। मुंगिके पांवमे धुंगुर बाजे, ओबी अल्ला सुनता है ॥४॥ जंगम होकर लिंग बंधावें, घर घर फेरी फिरता है। शंख बजाकर भिच्छा मागे, यौक्या साहेब मिलता है ॥५॥ कहत कबीरा सुनभई साधू, मनकी माला जपता है । जो भावभगतसे ध्यान धरत है, उन्कू अल्ला मिलता है ॥ ६॥ अशा नानाप्रकारच्या कृति साधुत्वाच्या नावाखाली चाललेल्या दृष्टीस पडतात. पण त्यांचे आश्चर्य मानण्यापेक्षा त्यांची भक्तमंडळी असल्या कृतींना व जल्पनांना मान डोलवितात हे अधिक आश्चर्य होय. कोणी आपण वर्षानुवर्ष खात नाही ह्मणून कंडी पिकवितो, तर कोणी पांच दहा वर्षांत विधिच केला नाही ह्मणतो! आणि भोळे भाविक तर काय केवळ वेडेच बनलेले असतात! कोणी गुरूंना परातीत बसवून न्हाऊ घालतात, तर कोणी कौपीनतीर्थ सेवन करतात ! असल्या प्रकारचे गुरुशिष्य 'अडक्याचे तीन मिळाले तरी टाकावेत' असें समर्थानी झटलें आहे तें अक्षरशः खरें आहे, असली भक्ति हणजे शुद्ध खुळेपणा होय. सर्व योगांमध्ये भक्तियोग हा अत्यंत सुलभ व गोड आहे ही गोष्ट खरी. पण त्यांत अतिशय दोष आहे तो हाच की, त्याची मजल गौणीभक्तीच्या पुढे जात नाही. हेच काय तें अत्यंत अनिष्ट असते. गौणीभक्ति ही अत्यंत क्षुद्र व कनिष्ठ आहे. खरें खरें ज्ञान देणारी, खरी खरी मोक्षाला पोचविणारी, मृन्मय अंधारांतून ईश्वरी तेजांस नेणारी फक्त एक पराभक्तिच होय. भक्तीला ज्ञानाचे स्वरूप येते तेव्हांच ती परिपूर्णतेला पोंचते, व तिलाच 'पराभक्ति' हे नांव प्राप्त होते. नाही तर भागीरथीच्या तीरावरील चिखलांत लोळत पडून आही भागीरथींतच स्नान करीत आहों असें झटल्याप्रमाणे आहे! ह्या विघ्नांतून पार पडण्याला चांगला विचारी व वैराग्यशीलच मनुष्य लागतो. गुरूच्या आंगीं जसा अधिकार व जे गुण लागतात, त्याचप्रमाणे शिष्याच्या आंगींही एक अधिकार व गुण लागतो. नाहीतर कोणी शिष्यत्वालाच पात्र होणार नाही. गुरूचा ज्ञानोपदेश ग्रहण करण्याची शक्ति हा त्यास अधिकार पाहिजे. वि गुरुपदाला जे गुण अवश्य पाहिजेत ते गुरूच्या आंगीं आहेत किंवा नाहीत ह्या कसास लावून पाहण्याचा शिष्याच्या आंगी गुण पाहिजे. साधारण जड रत्नाचे