या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. परीक्षकही जर पैशापासरी दृष्टीस पडत नाहीत, तर नररत्नाचे पारखी तरी खंडोगणती येणार कोठून ? ह्यावरून शिष्य किंवा भक्त होणे हे सुद्धां कांहीं वाटेवरचे काम नव्हे ही गोष्ट लक्ष्यांत येईलच. ह्मणूनच एका साधूने झटले आहे की “गुरु पाहिजे तितके मिळतील, पण चेलाच मिळणे कठीण ! " सत्पात्र मिळेल तरच तें गुरुपदाला शोभेल. नाहीतर त्यापेक्षां विविक्षित गुरु न केलेला बरा. कारण, जो खरा जिज्ञासु आहे, ज्याला खरा खरा उपदेशच ग्रहण करणे आहे, त्याला वृक्ष, पाषाण, प्राणी, वनस्पति-नव्हे प्रत्येक तल व पदार्थ-हे गुरुच आहेत. ह्मणूनच श्रीमद्भागवतांत श्री अवधूतांनी सर्प, भुंग, व्याध कृमिकीटकादि अनेक गुरु करून घेतले आहेत. अस्तु. कोणत्याही व्यक्तिमात्राची निंदा करण्याचा आझांस अधिकार नाही. कारण, प्रत्येक जीवात्मा हा ईश्वरी अंशच आहे. मग ज्यांत थोडे तरी वैराग्य, निस्पृहपणा, ब्रह्मचर्य इत्यादि भगवद्गुण वास्तव्य करतात, त्या सत्पुरुषाच्या ठाई ईश्वरी प्रभाव नाही असे कोण ह्मणेल ? फार तर काय पण एखादा शुद्ध भोंदू जरी घेतला, तरी त्यांत सुद्धां ईश्वरी तत्त्व हे असतेच. कारण, शेकडों लोकांच। चित्ते आकर्षण करून घेणे ही गोष्ट तरी काय सामान्य आहे ? मग ती को त्याही मार्गाने असो. हे तत्त्व जर खरें, तर सत्पुरुषाची निंदा हा दोष नव्हे काय ? अवश्य दोषच आहे. अशा महद्विभूतींच्या संबंधाने आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती ही की, त्यांच्या अनुग्रहाने ह्मणा, की प्रसादाने ह्मणा, जो एक प्रकारचा आत्मानुभव आलेला असतो, तो स्वसंवेद्य असतो, त्याचा वाच्यांश करणे किंवा तो चव्हाट्यावर मांडणें उक्त नव्हे, आणि तो तसा मांडतांही पण यावयाचा नाही. तर सत्पुरुषाचे चरित्र व त्याचे उपदेशामृत येवढेच कायतें जगापुढे आणायाचे असते. चरित्र-आणि त्यांत साधूचे-लिहिण्याचे कामही फार कठीण आहे. तें शुद्ध, अद्भुत व बोधप्रद पाहिजे. नाहीतर एखादा भक्त आपल्या भक्तीच्या वेडांत व वेदांतज्ञानाच्या घमेंडींत कोणीकडे बरळत सुटला तर, त्या सत्पुरुषाचा गौरव होण्याचा एका बाजूस राहून उलट विटंबना मात्र होते. उपदेशामृताची गोष्टही तशीच. तो उपदेश सर्वमान्य व जनमनोल्हादक असा पाहिजे. त्याने भक्तजनांची व रसिकांची हृदयें प्रफुल्लित झाली पाहिजेत. केवळ निरर्थक जाडे जाडे व अपरिचित शब्द घालून चर्वित चर्वण केलें ह्मणजे, वेदांत हाती आला, व हस्व दीर्थीची, यतिभंगांची व छंदोभगांची पाहिजे तशी