या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०.१. खिचडी करून असंख्य छंदांची व प्राचीन आख्यानांची नामावलि दिली झणजे कांही परमार्थ हातास चढत नाही. उलट भक्तमंडळाच्या अज्ञानाची व भोळसरपणाची लव्याजम्यानिशी मिरवत निघालेली स्वारी मात्र पाहावयास मिळते. ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा, मोरोपंती भारत, रामायणे अशांसारखे-किंवा त्यांच्या तोडीचे-ग्रंथ असतील तरच ते लोकवंद्य होतील. नाहीतर सारा फेसच फेस ! येवढी प्रस्तावना करून आतां प्रस्तुत पुढे घेतलेल्या 'अनंतनाथस्फूर्ति'मध्ये काय काय आहे त्याचा विचार करूं. वरच्या विस्तृत लेखावरून ही एक गोष्ट वाचकांच्या लक्षात आलीच असेल की, आमांस व्यक्तिमात्राच्या संबंधाने काहीच विचार करावयाचा नाही. तर 'ह्या अनंतनाथस्फूर्ति'तून जेवढे लेखरूपाने बाहेर पडले आहे, तेवढ्याच संबंधाने विचार कर्तव्य आहे; व तो करण्याचा अधिकार कोणासही आहे. तेव्हां त्याबद्दल श्रीमदनंतभक्तांना कुरकुर करण्याचे किंवा रोष करण्याचे कारण नाही हे उघड आहे. ह्याकरितां प्रथम विनंती, नंतर चरित्र, नंतर अष्टक आणि त्यानंतर त्यांचे काव्य ही क्रमाक्रमानेच हाती घेऊ. ही वकीलसाहेबांची पहिली विनंति सरासरी दोनच पृष्ठे असल्यामुळे तीत कांही विशेष असण्याचा संभव नाही. तथापि कोणत्याही दैवताच्या देवालयाच्या कळसाचे दुरून जरी दर्शन झाले, तरी ते मोठे पुण्यप्रद व साक्षात् । देवदर्शन झाल्याप्रमाणेच होते, ही जगाची रूढी आहे. त्याप्रमाणे 'अनंतस्फूती'चा वकीलसाहेबांनी दाखवून दिलेला किनारा, आमी व आमच्या वाचकांनी अवश्य अवलोकनांत घेतला पाहिजे. तर पुढील अनंताची काहीशी कल्पना उभी राहील. 'श्रीचे भक्त' ह्मणतात: "नाम, ग्राम, पंथ आणि बोली संतस्वानंदाला शोभत नाही." “ह्या ग्रंथांतील काव्यविलास (!) नमुन्यादाखल आहे." “सुदामचरित्र, ध्रुवचरित्र इ० चरित्रे श्रीस्वानुभूति, सशास्त्र, अवतारापूर्वीच्या गोष्टी आहेत. (?)" " सर्व धर्माचे नीतीस मान्य आहेत." "नित्य प्रचारांतील नाटकाधार नवरस परिपूर्ण अर्थाने सर्व धर्मात आत्मानुभव कबूल होतात, त्याच भावार्थाने प्राकृत भाषेत वरील चरित्रे श्रीमदनंत सरुविरचित आहेत." "ही चरित्रे नवी नाहीत परंतु प्राकृत आणि सुबोध या नात्याने नवींच आहेत."