या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. 170 आत्मभक्ती, रंगलूट (ती कशी काय ?) आहे तेथें कमी काहीच नाही." " पारमार्थिक जनांनी सर्वकाव्य प्रसिद्ध होण्याचे उत्तेजनार्थ अनंतनाथस्फूतीची खरेदी करावी. असा समभावाचा पदाभिलाष आहे. (अर्थ उत्ताम्यच आहे!)". वरील डिफेन्सामध्ये वकीलसाहेबांनी आपला हात आखडता घेतल्यामुळे प्रपंचासक्तजनांना गहनवेदांतज्ञानाच्या संशयाचा फायदा' यथेच्छ घेतां आला नाही, ही मोठी दिलगिरीची गोष्ट होय. तथापि खंडाळ्याजवळचा एक बोगदा पाहिला तरी, साऱ्या घाटाची कल्पना मनांत बरीच उभी राहते. ह्या न्यायाने पुढील स्फूर्तीची धुंदुक धुंदुक मूर्ति तरी येवढ्याने वाचकांपुढे उभी राहण्यास काही हरकत नाही. । आतां वेद० मास्तरसाहेब आझांस 'लीला' कशी काय दाखवितात तें पाहूया. ह्या 'अपार भावी' लीलेचे-किंवा चरित्राचे त्यांनी पूर्वाध व उत्तरार्ध असे दोन भाग केले आहेत. पूर्वार्ध सारा भक्तीच्या महोदधींत व 'अपार भावी लीले 'तच खर्च झाला आहे. व उत्तरार्धात मात्र एकनाथ यांचे चरित्र आहे. (एकनाथ यांचे ह्मणण्याचे कारण, मास्तरसाहेब पुढे स्पष्ट करतीलच.) बहुतेक चरित्र गुरुवाक्यांत व अपार भावी लीलेंत, किंवा अज्ञात अशा वेदांतजलानेच भरले आहे. तें आतां प्रथमपासूनच पाहूं. मंगलाचरणाचा मासला: सदां गाऊं भावें गितिं गुरुवरां ऐक्य मतिचा । निजाचा जो ठेवा जगनगभवां प्रेम गतिचा ॥ गती जाची (अहाहा ! काय पण सामान्यरूपाचा मासला !) ऐसी धरि हरि भरी कावडि सदां ।। सदां रिद्धी सिद्धी बटकरिमिसें राबति पदां ॥ १॥ पदाचीया गोडी मधुवर उडी मासिवतसी (!!!)। जडोनीया चित्तां गिति रुचि जडे अन्निं भुकसी॥ सदां गाथा गातां सदय मतिची नाथ कविता । हितां आली हातां अनुभवमतां चित्तसमता ॥२॥ आजपर्यंत भले बुरे-जाण अजाण--अनेक कवी होऊन गेले. परंतु प्रस्तुत कवीइतका निरंकुशत्वाचा अम्मल कोणीच गाजविलेला नाही. हस्व असेल तेथे दीर्घ, व दीर्घ असेल तेथें हस्व करून शब्दबी व व्याकरणाची मुद्दाम खोड जिरवावयाची, हा तर कवीचा नैसर्गिक गुण आहे.