या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__ अंक १२ वा. डिसेंबर १८९८. २८३ पेक्षां 'बाल्यदशेतला सुरवंट' झटलें तर मात्र खासें शोभेल ! बिचाऱ्याचे स्मरण झाले की अद्याप सुद्धा अंगावर काटा उभा राहतो. त्याच्या आलीकडची पुस्तकें कांहींशी बरी आहेत, पण ती अगदीच संक्षिप्त आहेत. हा विषय पाहिजे तितका विस्तृत व गोड करून मुलांच्या मनांत बिंबवून देण्यासारखा आहे खरा. पण इतके परिश्रम किती शिक्षक घेत असतील, ह्याचाही संशयच. सामान्य शिक्षकांस तशी साधनें अनुकूलही पण नसतात, ही गोष्ट विसरता कामा नये. ह्या सर्व स्थितीचे वर्णन ग्रंथकारांनी आपल्या प्रस्तावनेत फारच सुरेख केले आहे. आणि तें अक्षरशः खरे आहे. अस्तु. ही सारी दैन्यावस्था दूर करावी झणून बडोदें येथे 'दामोदर सांवळाराम आणि मंडळी' स्थापन झाली आहे. तीत मोठमोठे श्रीमान् व विद्वान् सभासद सुमारे १६ असून श्री. रा. सा. संपतराव गायकवाड ब्यारिस्टर ऍट लॉ हे अध्यक्ष आहेत. ह्या मंडळीनें ग्रंथसंपादकत्वाचें व प्रकाशकत्वाचे काम अंगिकारले आहे. तेव्हां ती चांगले यश संपादन करील असा भरंवसा वाटतो. प्रस्तुतचा ' मुसलमानी रियासत' हा ग्रंथ तिचंच एक अपत्य आहे. ह्याचे जनक रा. सा० सरदेसाई हे वर सांगण्यांत आलेच आहे. त्यांस इतिहास हा विषय प्रिय आहे, आवडता आहे; त्याची त्यांस हौस आहे येवढेच नव्हे, तर त्याविषयाशी ते अगदी तद्रूप झाले आहेत, असे त्यांच्या कृतीवरून स्पष्ट दिसून येते. ह्याच ग्रंथासोबत, प्रस्तुत ग्रंथकारांनी बडोद्याच्या 'सहविचारिणी' सभेमध्ये 'इतिहास' ह्या विषयावर दिलेल्या दोन व्याख्यानांचा सारांश छापून आलेला आहे, तेवढा जरी कोणी अवलोकन केला, तरी सुद्धा आमच्या ह्मणण्याची सत्यता सहज कळून येईल. राव. सरदेसाई ह्यांस इतिहासविषयाची केवढी उत्सुकता व कळकळ आहे, आणि त्यामध्ये ते कसे रात्रंदिवस पोहत आहेत तें वाचकांस कळण्यासाठी, त्यांच्या प्रस्तावनेंतील काही वाक्ये खाली उतरून घेतों: “पंतोजी झणजे कान पिळवटणारा; नेमलेली पुस्तकें मुलांकडून पाठ करवून परीक्षेत जास्त मुलें उत्तीर्ण करण्यासाठी हापापलेला. ...... ह्याचा दोष सर्वखीं. पंतोजीकडेच आहे असा माझे ह्मणण्याचा उद्देश नाही. आमच्या इकडील शिक्षणक्रमाचे अनेक वाईट परिणाम आतां बहुतेकांस कळू लागले आहेत. ...... निरुपायास्तव पंतोजीचा अथवा वर्तमानपत्रकाराचा धंदा पत्करावा लागतो. ...... पंतोजीच्या आंगी हौस मात्र पाहिजे. पंतोजीने आपले काम समाधानकारक केलें असतां मानसिक आनंदाच्या रूपाने जो मोबदला त्यास मिळतो, त्याचे महत्त्व