या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक वा. आगष्ट १९०१. अर्थाचा पत्ता सुद्धा लागू नये ह्मणून तर त्याने पक्का बंदोबस्त केला आहे. आणि सामान्यरूप ह्मणून कोठे दृष्टीस पडूं द्यावयाचे नाही ही त्याची भीष्मप्रतिज्ञा आहे. 'गिति' 'कावडि' आणि 'अन्निं ' 'भुकसी' अहाहा ! केवढा हा प्रसाद ? 'बटकुरमिसें' हा तर काय ठेवणीचाच शब्द ! पण किती केले तरी 'मासिवतसी' ह्या गुलदस्ताचा उलगडा कांही आमच्या वाचकांस होणे नाही. 'मासिवत' ह्मणजे माशीप्रमाणे, आणि त्याला वर 'सी'-सारखें हा प्रत्यय ! इतकी स्फूर्ति उंच उसळल्यावर आणखी पाहिजे ते काय ? ह्यापुढे मास्तरसाहेब ह्या दुर्धर कालगतीप्रमाणे पैदा होत असलेल्या भोंदू गुरूचे वर्णन करतात: माळेत पाणि [ ते कसे काय ? ] धरुनी किति ते जपाला । लावोनि नेत्र बसले किति खाति पाला ॥ फांसोनि राख कितिएक जटा धरोनी ! भोंदीयले दिनभु(१) तें भुलती भरोनी ॥ १॥ ऐसे कलीमधिल संत परोपकारी । [श्रीमदनंत सद्गुरु केव्हांचे ? द्वापारयुगांतील की काय ?] सारेचि संत असले फिरती भिकारी॥ येथे नसे भजन तें मग पूजनाचा। चाले नची विधि बरा स्मरि राम साचा ॥२॥ या हो भवीं गुरु घरोघरि राबताती । शिष्यां नसे गणित ते बहु बोडिताती ॥ काय आहे शब्दांची प्रौढी ?] नाही अशांत गति गा उलटी फजीती। संसार सांडुनि फुकां जनि हीन होती ॥३॥ निव योग्यापुढे 'खाति' 'भोंदीयलें' 'दिनभु' 'स्मरि' असल्या शुद्धाशुद्धाचा विचार तर करावयाचाच नाही. पण बाकी तरी काय ? 'किती ते माळेत पाणि (हात) धरुनी जपाला करिती !' वः! माळेत पाणि तो कसा काय धरावयाचा ? इतर लोक हातांत माळ घेऊन जप करतात, पण माळेत हात घालून जप करण्याची स्फूर्ति' मात्र लोकोत्तर खरी ! पण ह्यांत विशेष चमत्कार वाटपाचे प्रयोजन नाही. कारण, "नाथाच्या घरची उलटीच खूण, पाण्याला लागली उलटीच तान्ह" आणि 'अनंतनाथ' तर एकनाथाचाच अवतार, मग