या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. त्यांच्या घरी साराच प्रकार उलटा असला, तर नवल ते कोणते? 'दिनभु' तें काय ? परमेश्वर जाणे! 'बोधिताती' शब्द पारिसच्या प्रदर्शनांत पाठविल्यास सुवर्णाचें पदक ठेवलेलें ! हे असो. आतां भक्तांच्या वर्णनाचा, प्रेमळपणाचा, व वेदांतज्ञानाचा मासला: "श्रीमदनंतकृत काव्यग्रंथ छापद्वारे(!) प्रसिद्ध होत आहे." “या कलियुगामध्ये नामावांचून अन्य साधनें सर्वोत्तम जो परमात्मा त्याने निदिली." वः ! काय पण सिद्धांत ! बिचारा परमात्मा कोठे व कधी आला होता, हे सर्युलर काढावयाला? बरें; मग ब्रह्मचर्य व्रत, पातिव्रत्य, दया नीति, परोपकार वगैरे सर्व टाकून द्यावयाची की काय ? मग तर ठीक ! 'राम राम' ह्मणावें, आणि मग पाहिजे तें काम करावें ! ही स्फूर्ति फार उत्तम ह्यांत शंका नाही. आतां कालाचा महिमा ऐका:"हा काल फार भयंकर; तो असा की शक्तिहीन देह, अपारसंदेह, स्वकीयांचा स्नेह फार, आपपरभाव. मिथ्या व्यवसाव, सर्वांचा (अंहः! सामान्यरूपाबद्दल बोलावयाचें नाही.) अंतरांत निरंतर चिंता, नेहेमी गर्वांचा पर्वात असणे, सर्व तमाम मोहमदिरेने गर्क झालेले, मत्सरावांच कोठेच कांही दिसत नाही. वेदकर्माचा -हास, निंदा हिची (कोणाचा :) वडील बहीण, प्रत्येकास जातीचा अभिमान. ह्मणजे मी ब्राह्मण हा, असा सर्व प्रकार उलट दृष्टीस पडतो." आतां संतवर्णन: "सांप्रत संतसाधु यांची ओळख पंथभेषावांचून नाही. ते भेष जे मागे रामदासादिक संत झाले त्यांचे, उदाहरणार्थ रामदासपंथांत जे शिरले त्यांणी त्यांचा सारखा बाणा केला ह्मणजे संत बनला. याचप्रमाणे कबीर, नानक, आदिकरून सर्व संतांचे पंथभेष नसून हल्ली जिकडे तिकडे त्यावांचून कांहीं ओळखच नाही. केवढें आश्चर्य." "जगतींत संतांची ओळख संताला, कारण सृष्टिक्रमच दोन प्रकारचा आहे. संत व असंत यांत भावावांचून काही फरक नाही." पण भक्तांच्या 'भावा' चा अर्थ तरी संतावांचून कोठे कळणार ? असो. पुढेः “ही महिमा सृष्टिक्रमांत दृश्यभावाने परोक्ष समजानें भावना करतात. यामुळे सर्व घोंटाळा आहे." आतां चरित्राचा श्रीगणेशा: " श्रीमदनंतसद्गुरु हा संतावतार अपारभावी आहे. यांचे चरित्र अर्व अपार, हा अविनाशी परमात्मा पंथभेषरहित अवधूतवेषाने (अद्वैतरूपाने) या