या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०१. १८९ जगतामध्ये सर्वकाल भावानुसार अधिकारपरत्वे सर्वांना भेटत आहे. यांची सर्व लीला श्रीमत्सद्गुरु एकनाथाप्रमाणेच समजावी. फक्त कालमान याशिवाय दुसरा प्रकार काही नाही. समभावी वर्तन श्री सद्गुरु एकनाथावांचून नाही. सर्व देहभाव झडून सर्वत्र आत्मभाव जा संगतीपासून होऊन सर्वच हरी नटला आहे असा अविनाशी भाव होतो, असा संतमहिमा आहे. तर त्या ठिकाणी लोकत्रय मायाव्यवसाय कोठून असणार, हे उघड सर्वांचा लक्षांत येणार आहे. आतां जगतीमध्ये देहवर्तन, जनाप्रमाणे जनाला दिसणार, संतांना संतांप्रमाणे. असा हा निगम गुरु अनंत यांनी पैठणी ब्रह्मचारीबुवा ह्मणतात. चित्रकला अप्रतिम, बाहेरचे नाथीं चित्राचा देखावा फार मनोरम पहाण्यासारखा आहे. उद्योग जो तेंच नांव असा जगक्रम ( मास्तर साहेबांचे शुद्ध शब्द ध्यानात ठेवण्यासारखे आहेत !) आहे. हा पुरुष किती अधिकाराचा आहे, हे समजण्यास जनाला अधिकार नाही. [तर कोणाला आहे ? फक्त त्यांच्या भक्तमंडळाला. तें जनाबाहेरचे आहे की काय ?] कारण जांचा पंथ निराकार असें अपूर्व वर्तन." " यावरून संतवर्णन सर्वांचा लक्षांत भावानुसार येणार आहे." “या मानवीसारखा संभ्रम इतर योनीचे ठिकाणी नाही." वाक्य फार तारीफ करण्यासारखेच खरें! ह्या येवढ्याशा चरित्रांत गुरुप्रसादकाव्याची तर काय गर्दीच गर्दी उडवून दिली आहे. त्यांतील मासल्याचा एकच श्लोकः मनसुमन प्रभाती कांचनी कोंदणाची। निगमनिळ हरी हा जोडिला अंतरींची॥ नवविधि मुळसूत्री बैसवी सांख्यशास्त्रीं। प्रभु दिननिशिं त्याचे अंतरी प्रेमपात्रीं ॥१॥ याचा अर्थ लावावयाला भक्तकामकल्पद्रुमच पाहिजे, नाहीतर तो कळणार कसा ? 'प्र'च्या योगाने मागील 'न' अक्षरास द्वित्त्व येऊन छंदोभंग होतो, ह्याची तरी दाद कोणाला ? अक्षरांची जुळणी झणजे काव्य; शब्दांची ठेवण झणजे रस; आणि कांहींच न उमजणे झणजे वेदांत हाच ज्यांचा कोश, त्यांच्यांशी वितंडवाद घालण्यांत तरी अर्थ कोणता ? हा चरित्राच्या पूर्वार्धाचा मासला झाला. आतां उत्तरार्धाची थोडीशी चांचणः " सर्व गुणभावलीला आत्मरूपाने आहे. तेथे गुणाकृति नाही. सगुणावांचून साक्ष नाही, साक्षीकरितां कर्मानुबंध, सगुणी, खानंद विलासी, परमात्म