या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० केरळकोकिळ, पुस्तक १५ वें.. विश्राममंदिर असी ही नराची तनु निर्गुण भावयुक्त आहे. हा गीत गाण्याचा ठिकाणा होय. आत्मार्थभावजडणी हा सगुणाचा प्रभाव आहे, ह्मणून जी निर्गुण तीच सगुणाकृति असी ही जगलीला (!) नाटकाधार आहे. (१) मुनीने पुराणांची साक्षी केली, सर्व आत्मरचना या भावाने थोर थोर समाधान (आत्मस्थितिवंत) झाले. असो. परमात्म भावी संत असंख्य अवसाने यांनी शोभिवंत, व सर्वसाक्षी भाववंत, सर्वभावाने सिद्ध, जो अतक्य, शांतीचा भर्ता तो सर्व कर्ता, हर्ता सदां सहज निराधार हाच सर्वाला आधार आहे. अर्थात् भवभावरहित आत्मज्ञान दाता असा सद्गुरु या देही पहावा.' पतिताला (अहंकाररहिताला.) तारणारा एक संतानंत, इतराला अधिकार नाही. सर्वांना गतिदायक हाच परमात्मा." ह्यावरून ह्या अनंतभक्तमंडळांच्या वेदांताचा मासला ध्यानात येईलच. विनाकारण व अप्रासंगिक यमकांची गर्दीच गर्दी करणे, विरामांना पाहिजे तेथून हांकून लावणे, वाक्यांत कर्ता आहे तर क्रियापद नाहीं, क्रियापद आहे तर कर्ता नाही, अशा निष्फळ वाक्यांची शृंखळा बांधणे, ह्याचंच नांव 'विलास' असा त्यांचा समज आहे. आतां कांही त्यांच्या आवडत्या व प्रासादिक शब्दांचीच ठेवणः-- "उद्योग्य (!) चित्रे काढणेचा." " नंतर स्नानादिक विलास (!!) होऊन आपआपले उद्योगी निमग्न असत." विलास' 'लीला' 'अनंत' 'अपार' 'लीलावी' हे शब्द मास्तरांचे फारच लाडके आहेत. त्यांच्याशिवाय उभयतांनाही एक पाउल टाकवत नाही. ही भक्तमंडळी संतांच्या 'अपार भावी लीलेला' च जर येवढी तुटून पडली, तर त्यांची प्रसादमय काव्ये पाहिल्यावर त्यांचे देहभान हरपेल हे काय सांगावे ? काव्यावर ते किती तन्मय झाले आहेत,तें पुढील वाक्यावरून कळेल. ते ह्मणतात:-- " या सद्गुरुभजनरूप कवित्वांत सर्व अनुसंधान रुक्मिणीस्वयंवराचें आहे, त्यांत सर्व प्रकारचे छंद, सर्व अलंकार, सर्व प्रकारचे रस, सर्वत्र अपरोक्षभाव, शब्दरचना यमकपूर्वक फारच आनंदकारक, सर्व अनुभव हिरेकोंदणयुक्त जडलेले आहेत. [अनुभवाला हिरे ते कसे काय जडवावयाचे ?] संतकवित्व कोकिळ न्यायाचे आहे. करितां अनिर्वाच्यरूप, वळीने (!!) अध्यात्मभाव स्वात्मसुखदायक अपूर्व आहे. - असा हा अपार लीलावी श्रीमदनंत यांचा कवित्वभाव पुढील अभंगावरून लक्षात येईल." मास्तर हे मोठे वेदांती व विद्वान् असावेत असा आमचा समज होता. पण। तो भ्रम वरच्या वाक्पांडित्यांतील एका शब्दानेच दूर झाला. व त्यावरून मास्तर