या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १९०१. १९१ हे इंग्रजी किंवा मराठी शाळेचेही मास्तर नसून केवळ गांवठी शाळेवरचे पंतोजी असावेत, असे स्पष्ट दिसते. तो शब्द ह्मणजे 'वळीनें' हा होय. वळीने झणजे ओळीने असा अर्थ ! ह्या विद्वत्तेपुढे हात टेकल्यावांचून दुसरा इलाजच नाही. ह्यापुढे 'अनंतनाथस्फूर्ती'ची ग्रंथसंख्या व त्यांचे वर्णन आहे. (पुढे पाहूं!) पत्रव्यवहार. श्रीविश्वेश प्रसन्न. विक्रमनीति-गीति. ज्ञानावांचुन मिथ्या-वैराग्यत्व न कुणासि दावावें॥ सुशें निजमित्राच्या हृदया कपटादिकें न दुखवावें, ॥१॥ अपराधाविण भाषण कोणाही क्रोधयुक्त न करावें, ॥ वाचे अभद्र कोणा न वदावें, हे कधी न विसरावें ॥२॥ सोडावी दुःसंगति, संतजनाला सदैव वांकावें, ॥ मोठ्या अन्यायाविण निजभार्येला कदा न टाकावें, ॥३॥ कोणी भविष्य कथिलें न वहावी व्यर्थ काळजी त्याची ॥ वसा धरावा लक्ष्मी राहील की अढळ साची ॥४॥ चोरास न सांगावें नामग्रामादि सत्य में अपलें ॥ दानश्रेयाविण दिन जावा न ह्मणोनि पाहिजे जपलें ॥ ५ ॥ ईश्वरभजनावांचुन यत्किचितही न काल दवडावा ॥ करितील मायबापें प्राणाहुनि तोचि बोध अवडावा ॥ ६ ॥ खोटी साक्ष न द्यावी, नीचाच्या संगतीस तोडावें ॥ मोठ्या लाभास्तवही अत्यल्प कुबुद्धिला न जोडावें, ॥ ७ ॥ कार्य असे जे करणे करिजावें देशकाल जाणन कोणाच्याही लाभा सुशे द्यावें न विघ्न आणून ॥८॥ थट्टा न करावी कधिं, सर्व जनांशी मिळून ऐसावें। अडला भिडला पाहुनि साह्य करावें उगें न बैसावें ॥ ९ ॥ बहुजनमतास येइल आपणही तीच गोष्ट मानावी ॥ पर भाग्यवंत पाहुनि कधिहि असूया मनांत नाणावी ॥ १०॥