या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. धनयौवनआयुष्या नित्य असे चंचलत्व समजावें ॥ देशांतरा कराया एकाने केधवांहि नच जावें ॥ ११ ॥ शक्त्यनुसार करावा धर्म, सुताचा न फार लाड कधी, ॥ जें ज्यास देउं केलें तें द्यावें त्या न लावितां अवधी ॥ १२ ॥ चित्तीं शांति धरावी, सत्य, मधुर, नम्र भाषण वदावें ॥ क्रोधास आवरावें, कामादिक शत्रुपंचक वधावें, ॥ १३ ॥ 'परउपकार करावा नित्य, कुणाचें न वर्म काढावें, ॥ नास्तिकता न वरावी, विपत्तिकाली न धैर्य सोडावें, ॥ १४ ॥ 'न कथावी स्वविपत्ती विफल,' द्यूतामधे नच शिरावें, संपत्तिकाल येतां पूर्वस्थितिला कदा न विसरावें, ॥ १५ ॥ स्वस्तुतिला न भुलावें, परधन वमनासमान मानावें, ॥ इच्छा परस्त्रियेची करणे अतिघोरपाप जाणावें ॥ १६ ॥ ठेवोनिया स्त्रियांवरि विश्वास न त्यांस गुह्य सांगावें ॥ बहुतांचें ज्या कामी हित त्यामध्ये सदा पुढे व्हावें, ॥ १७ ॥ रिण काढुन न करावा सण, व्हावा प्राप्तिहून खर्च उणा, ॥ वर्जावी परनिंदा, सुज्ञे घ्यावें परांचिया सुगुणां, ॥ १८ ॥ पदरांत चूक घ्यावी, दुसऱ्याला योग्य मागि लावावें, ॥ ईश्वरभय मानावें, मृत्यूचे स्मरण नित्य ठेवावें, ॥ १९ ॥ सर्वां भूतांविषयीं अक्षय हृदयीं दयाव्रत धरावें ॥ कर्म स्व-नाशकारक जरि तें प्रिय इंद्रियांस न करावें ॥ २० ॥ कर्म करावें ऐसें कीर्ती राहील आपुल्या मागें, ॥ ऐशापरी प्रधाना विक्रम राजेंद्र नीतिला सांगे ॥ २१ ॥ आर्या सत्कविवर्या कोकिलसंपादकासि या आर्या ॥ भावें समर्पिल्या म्यां सानंदें ते बघोत मत्कार्या ॥ १ ॥ असतील यांत दोषहि नसतील असें न बोलवे मजला ॥ सुज्ञजनी गुण व्यावे दुग्धासचि हंस जेविं घे न जला ॥२॥ परशुराम नारायण बेहेरे. श्रीविष्णुमंदिर-गोवें. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJU DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.