या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १५] [अं०९ लोकोत्तर चमत्कार. पाण्यावरून चालणारी बायसेकल. -VAIDYA दिवसेंदिवस मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा प्रभाव वाढतच चाललेला आहे. नवीन नवीन निघालेल्या कल्पना ऐकून बुद्धि गुंग होऊन जाते, आणि आश्चयोन जीव चकित होतो. पायाने चालणारी तीन चाकी गाडी कधी पाण्यावरून जाईल हे आजपर्यंत कोणाच्या ध्यानीमनींही नव्हते, परतु ती गोष्ट आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावयास मिळत आहे. प्रथमतः गलबताप्रमाणे अवजारें लावून रुळावरून वायूच्या साह्याने गाड्या चालविण्याची युक्ति निघाली. चीन देशांत तर अद्याप रुळांवांचूनच शीड लावून गाड्या नेण्याचा प्रघात आहे. त्यानंतर काही देशांत पाण्याने गाड्या चालविण्याचा प्रघात पडला. हल्लीच्या रुळांच्या सडकेऐवजी तेथे पाण्याचा एक कालवा बांधलेला असे; व त्या कालव्याच्या दोन्ही किनान्यांवर रूळ बसविलेले असत. व मध्यंतरी गाडी असून लीस हल्लीच्या आगबोटीप्रमाणे बारिक बारिक पंखे लावलेले असत. हे पंखे हालविले की, त्या कालव्यांतून ही गाडी सपाट्याने धांवत असे.