या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. जपानांत तर घोड्यां बैलांऐवजी मनुष्यच पुढे उभा राहून गाडी ओढतो. पांडेचरीस 'पुसपुस' ह्मणून गाड्या आहेत. त्यांत दोन दोन मनुष्ये बसतात, व मागून मजूरदार लोक त्याच्या मागे बसविलेल्या दांड्यांस धरून पुढे ढकलित असतात, व गाडी पाहिजे तिकडे वळवितां यावी ह्मणून बसणाराच्या हातांत सुकाणू असते. हे सुकाणूं डावीकडे फिरविले झणजे पुसपुस उजवीकडे वळतो, व तें उजवीकडे फिरविले झणजे तो डावीकडे वळतो. ह्याच गाड्या सांप्रत मद्रास इलाख्यांत दृष्टीस पडतात. कोचीमध्ये तर 'पुसपुसा' चे माहात्म्य फारच आहे. ह्याप्रमाणे गाड्यांचे अनेक प्रकार झाले. आलीकडे 'बायसेकल' व 'ट्रायसेकल'ला ऊतच आलेला आहे. 'ट्रायसेकल' ह्मणजे तीन चाकी गाडी, व 'बायसेकल' ह्मणजे दोन चाकी गाडी होय. ट्रायसेकलला पुढे दोन चाके असून पाठीमागे एक चाक असते. बसणाराने, पुढील दोन चाकांच्या कण्यावर बैठक असते, तिजवर बसून पायाने खालचा दांडा हालविला ह्मणजे ही गाडी सपाट्यांना धावू लागते. बायसेकलला पुढे एक मोठे चाक असून मागे एक अगदी लहान चाक असते. मोठ्या चाकाच्या वरच्या बाजूस बसणाराला बसावयासाठी एक खोगीर, व हातांत धरण्यासाठी सुकाणूऐवजी दांडा असतो. ह्याशिवाय, पुढे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना वगैरे इशारत करण्यासाठी एक घंटा केलेली असते. तिची थोडीशी कळ दाबली की, ती मोठ्याने वाजते, व बायसेकल येत असल्याचें सवीस समजतें. ट्रायसेकलपेक्षां बायसेकलवर बसण्याचे काम फार कठीण आहे. कारण, तींत एका मोठ्या उभ्या चक्रावर मनुष्याने आपला सर्व तोल सांभाळून धरावा लागतो. बायसेकलवर बसावयास शिकतांना नवख्या मनुष्याची फार तारांबळ उडते. अंमळ कोठे कांहीं आडवे आले, कशाचा धक्का बसला, मनुष्यांची दाटी वगैरे असली, किवा चटकन् वळण्याचा प्रसंग आला, तर बसणारा गाडीसहवर्तमान धाडकर जमिनीवर पडतो; व मग त्याची जी त्रेधा उडते ती पुसू नये. अथवा गाडी थांबवितांनाही तसाच प्रकार होतो. पण एकदां चांगले, बसतां येऊ लागले झणजे मग बायसेकल अतिशय जलद-किंबहुना ती