या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १९०१. आगगाडीच्या बरोबरीने-चालविता येते. तितकी ट्रायसेकल जात नाही. बायसेकल प्रत्येक तासास बारा बारा मैल नेणारे लोक पुष्कळ आहेत. पण रस्ता खराब वगैरे लागला ह्मणजे बायसेकलीचा खटारा मात्र हातांत किंवा पाठीवर वागविण्याचा प्रसंग येतो! पण बायसेकलींतही अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी कित्येक आपल्या लोकांस ऐकून सुद्धां माहित असण्याचा संभव नाही. उदाहरणार्थ कांचेची बायसेकल. ही अतिशय विलक्षण असते. केवळ शब्दावरून तिची कल्पना सुद्धां मनांत येणे शक्य नाही. कांचेची बायसेकल मटले की, मनुष्याच्या मनांत असें येते की, लोखंडाच्या केलेल्या बायसेकली जशा आपण पहातों, तशाच त-हेचें तीस कांचेचें सामान लावलेले असेल. परंतु कांचेच्या बायसेकलची रचना तशी नसून आपल्या कल्पनेच्या बाहेर असते. तींत एक मोठा कांचेचा पोकळ गोल केलेला असतो व त्यास एक लहानसें दार करून ते पुन्हा घट्ट लावता येते. त्या गोळ्यांत हवा खेळण्यासाठी बारीक बारीक छिद्रे 'ठेविलेली असतात. बसणारा तींत बसावयाचे वेळी तें कांचेचे दार उघडून त्या द्वारावाटे त्या पोकळ गोळ्यांत शिरतो, व मध्यंतरी लोखंडाचा कणा असतो त्यावर बसतो, आणि ते उघडलेले दार घट्ट लावून घेतो. कण्यावर बसणाराचे पाय कांचेच्या गोळ्याच्या पुढील आंगास लागतील अशी तजवीज केलेली असते. बसणारा आंत जातांच आपले पाय हालवू लागतो. ह्मणजे पिंजऱ्यांत बाळगलेले पांढरे उंदीर ज्याप्रमाणे चक्रे फिरवू लागतात, त्याप्रमाणे तो गोल झपाट्याने फिरूं लागून गाडी चालू होते. कांचेचा गोल निखालस वर्तुळ असल्यामुळे सपाट जमिनीवर तो फारच वेगाने धांवतो. ह्या गोष्टी केवळ सांगावांगीच्या नव्हेत, तर खरोखर अमेरिकेंत सध्या जारीने चालू आहेत; व ह्या निरनिराळ्या बायसेकलींची चित्रंही आमी पाहिली आहेत. ती अत्यंत मनोरम आहेत. परंतु त्यांच्या विस्तृतपणामुळे वगैरे ती सर्व चित्रे आह्मांस देण्यास सवड झाली नाही, याबद्दल मोठी दिलगिरी वाटते, पण त्या कामी नाइलाज आहे. जमिनीवरून बायसेकल चालविण्याची गोष्ट तर असोच; परंतु पाण्यावरून चालणान्या बायसेकली निघाल्या आहेत ह्मणून सांगितले