या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. तर आपणांस केवढें बरें आश्चर्य वाटेल ? परंतु त्याही निघाल्या आहेत ह्यांत शंका नाही. आज शिरोभागी जे चित्र दिले आहे, ते एका पाण्यावरून धावणाऱ्या बायसेकलचे आहे. ही बायसेकल अगदी साधी आहे. पण हिच्याहूनही अतिउत्तम रचनेच्या बायसेकलीही पाण्यावरून बेधडक चालवितां येतात. त्यांची रचना हुबेहुब जमिनीवरील बायसेकलींप्रमाणेच असून चक्रांना मात्र आगबोटीच्या पंख्याप्रमाणे दांते असतात. त्यामुळे ती चक्रे फिरूं लागतांच आगबोटीहूनही सपाट्याने ती पाणी तोडून आपली मजल झपाट्याने गांठते. असो. आज ज्या साध्या पाण्यावर चालणान्या बायसेकलचे चित्र दिले आहे, तिचीच रचना कशी आहे तेवढे सांगू. ह्या पाण्यावरून चालणाऱ्या बायसेकलचा अमेरिकेंतील लोक सर्व हिवाळाभर उपयोग करतात. हिच्या खालच्या बाजूस पाणी न शिरण्यासारखे तीन फुगे केलेले असतात. आणि त्या तिन्ही फुग्यांवरून तीन पोकळ नळ्या ठेवून त्या एका खोगराखाली एकत्र जोडलेल्या असतात. आणि त्याच्या वरच्या खोगरावर बसणारा बसतो. त्या बसणाराच्या पायांला, स्वाराच्या बटाला कांटेरी रिकिव्या असतात, त्याप्रमाणे रिकिब्या असून त्यांस लहानशी दोन वल्हीं-किंवा आगबोटीसारखे पंखे-अडकविलेली असतात. त्यामुळे बसणाराने पाय हालवि. तांच ती बायसेकल पाण्यावर सहज धांवे लागते. हिच्यावर बसणारे बहुधा शिकारी लोक असतात. त्यांच्या हातांत बंदुक असते, व खोगराखाली एक टोपली टांगलेली असते. हे लोक पाण्यावरून भराभर धांवत जाऊन पाण्यावर बसणारे पक्षी, बदके, पानकोंबडी, बगळ वगरे पक्षी मारून थोड्या वेळांत टोपली भरून परत येतात. ह्या पाण्यावरील बायसेकलांचा उपयोग शांत पाण्यांत मात्र होतो. मोठे तुफान असले, व पाण्याची फार खळबळ असली तर, तिच्यावरून जाता येत नाही. तथापि दुसऱ्या कितीएक जातीच्या बायसेकली आहेत त्या बन्याच पाण्याच्या खळबळींत धांवत असतात. Aamhana