या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.२८४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. रखा अवर्णनीय आहे. हे मी खानुभवावरून सांगू शकतो. गर्वोक्तीची. माफी मागून मला एवढेच कळवावेसे वाटते की, पंतोजीचा धंदा मला प्राप्त झाल्याबद्दल मी स्वतःस फार धन्य मानित आहे. ...... मुलांस एखादा विषय कंटाळवाणा अगर त्रासदायक वाटल्यास त्याचा दोष बहतांशी गुरूकडे आहे, असें मी समजतो. गुरूला तो विषय समजला तरी नसेल, किंवा तो मुलांस मनोरंजक होईल अशा रीतीने समजून देण्याची शक्ति त्याच्या आंगीं नसेल. ...... पुष्कळ मुलांस इतिहास व भूगोल त्रासदायक वाटतात. आयत्या वेळी थोडीशी घोकंपट्टी करून पास होण्यापुरते मार्क मिळविले ह्मणजे पुरे, असे त्यांस वाटते. पण वास्तविक रीत्या अत्यंत उनाड मुलाचें मन तल्लीन करून टाकण्याची शक्ति इतिहासाचे आंगी आहे. ....... इतिहासाचे अध्ययन करणारास हीन मानिलेल्या आपल्या इतिहासांतही शेकडो प्रसंग असे आढळतील, की नीतिमत्ता व बुद्धिमत्ता वाढविण्यास त्यांची शक्ति इतर देशांच्या इतिहासांपेक्षा काही कमी नाही. ...... जो शिक्षक विषय शिकविताना खतः तद्रूप होत नाही, त्याच्या हातून मुलांच्या ठिकाणी तल्लीनता उत्पन्न व्हावयाची नाही. रसाळ वाणीने केलेल्या विषयविवचनाने मुले आणि गुरु यांची सरूपता झाली पाहिजे.” हे इतिहासशिक्षणसंबंधाने त्यांचे विचार झाले. आतां त्या विषयाची त्यांची पारंगतता किती आहे, त्यांचे अवलोकन व प्रयत्न केवढे दांडगे आहेत, आणि पुढील उद्देश कसा विशाल आहे हे खालच्या उताऱ्यावरून लक्ष्यांत येईल. ते ह्मणतात: शक्ति इतरस आढळतीलारास हीन मानक इतिहासाचे ___“सुदैवाने या विषयाचे थोडेबहुत अध्ययन करण्याचा मला प्रसंग आला. साधनेंही मुबलक मिळाली, व त्यांचा उपयोग करून लहानसें शालोपयोगी पुस्तक लिहावें असें मनांत आले, आणि सवडीप्रमाणे उद्योग करून ते बहुतेक तडीस नेले. इतक्यांत काही एका गोष्टीची माहिती मिळविण्याकरितां बडोदें येथील श्रीमंत संपतराव गायकवाड यांनी स्थापिलेल्या श्रीसयाजीपुस्तकालयांत मी गेलों. इतके पुष्कळ ग्रंथ मला तेथे आढळले, की ते सर्व वाचल्याशिवाय त्या गोष्टीचे विवेचन पुरे झालेंसें होता. येणेप्रमाणे हळू हळू मी तयार केलेल्या पुस्तकाचे वैय्ययं मला कळून सरन शेवटी असेंही वाटले, की त्या पुस्तकालयांतील सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय, व निदान पंधरा वर्षे अध्ययन केल्याशिवाय, हिंदुस्थानचा इतिहास लिहं पहाणे विलक्षण साहस होय. ...... इतक्यांत प्रकाशकांचा व कित्येक स्नेही मंडळीचा को आग्रह पडल्यामुळे लिहिलेले पुस्तक तूर्त कसें तरी छापन काढावें व पढ़ें स्त अनुकूलता प्राप्त झाल्यास ह्या पुस्तकाचा केवळ काष्टमय सांगाडा इतक्या ताच उपयोग करून त्याजवर पुढे मोठी इमारत रचावी, असा मी संकल्प केला, ना व तदनुसार पुस्तक छापण्यास दिले."