या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १९०१. १९७ अर्थ पाहिजे. 'दासबोधा'तील खाली दिलेल्या ओव्यांचा खुलासेवार स्पष्ट अर्थ पाहिजे आहे. तो ज्यांच्या ज्यांच्या कडून येईल, त्यांचे त्यांचे प्रसिद्धपणे उपकार मानण्यात येतील. दोघां ऐशी तीन चालती। अगुणी अष्टधा प्रकृती ॥ अधोर्ध्व सांडून वर्तती। इंद्र फणी ऐशी ॥१॥ पणतू तोंडें भक्षितो पणजा । मूल बापासि मारी वोजा ॥ चुकाया गेला राजा । चौघां जणांचा ॥२॥ देव देवालयामध्ये लपाला । देऊळ पूजितां पावे त्याला ॥ स्सृष्टीमध्ये ज्याला त्याला । ऐसेंचि आहे ॥३॥ दोनी नामें एकास पडिलीं। लोकी नेमस्त कल्पिलीं। विवेकें प्रत्यये पाहिलीं। तो एकचि नाम ॥४॥ नाहीं पुरुष ना वनिता । लोकी कल्पिलें तत्त्वतां ॥ याचा बरा शोध घेतां । कांहींच नाहीं ॥५॥ स्त्री नदी पुरुष खळाळ । ऐसें बोलती सकळ ॥ विवरोन पाहतां निवळ । देह नाहीं ॥६॥ आपण आपणास कळेना । पाहों जातां आकळेना ॥ कशास कांहींच मिळेना ॥ उदंडपणें ॥७॥ एकलाचि उदंड झाला । उदंडचि एकला पडिला॥ आपणासि आपला गलबला । सोसवेना ॥८॥ एक असोनि फुटी पडली। फुटी असोन स्थिति एकली॥ विचित्र कळा पैसावली ॥ प्राणिमात्रीं॥९॥ ह्यांतील दोघे' कोण ? 'तीन' कोण ? 'पणतू' कोण ? 'आजा' कोण ? इत्यादि सर्व गोष्टींचा विद्वान् व रसिक जन उलगडा करतील अशी आशा आहे. -ए० के० को