या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिल, पुस्तक १५ वें. लोकोत्तर चमत्कार. सुसरीवरचा स्वार! हिंस्र पशु व पक्षी माणसाळवून त्यांच्या करवीं मनुष्य काय काय कामें करून घेईल, ह्याचा दिवसेंदिवस अदमासच होईनासा झाला आहे. पशुपक्ष्यांची गोष्ट तर असोच. पण मनुष्य आतां हळू हळू जलचरावरही आपला अम्मल बसवू लागला आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी मिस्तर वाटरसन ह्या नांवाचे गृहस्थ दक्षिणअमेरिकेंत प्रवासास गेले होते. तेथें फिरता फिरतां ते एक वेळ एक लहानशी नदी ओलांडून गेले. त्या नदीवर लहानशी होडी होती. तींतून पार पडल्यावर त्यांनी त्या होडीवाल्यास विचारले की पुढे कांहीं नदी वगैरे आहे काय ? तो ह्मणाला होय. इसेकिबो नांवाची नदी आहे. तेव्हां त्यांनी त्यास पुन्हा विचारले की, ती ओलांडून जावयास चांगल्या होड्या वगैरे आहेत काय? तो ह्मणाला, नाही. पण तेथें जिवंत सुसरी बार गलेल्या आहेत. त्यांच्या पाठीवरून पलीकडे नेतात! हे ऐकून वाटरसन् साहेब फारच बुचकळ्यांत पडले. आणि तसेच विचार करीत पुढे चालले, तो त्या होडीवाल्याने सांगितलेली नदी लागली. व तेथें एक हॉफक्यास्ट इंडियन उभा होता. त्यास विचारतां त्यानेही सुसर तयार आहे ह्मणून सांगितले. जवळ जाऊन पाहतात तों, खरोखरच एक प्रचंड सुसरीचें धूड, नाकांत वेसन घालून खुंट्यास अडकवून ठेवलेले नदीच्या तीरास दृष्टीस पडले. प्रथमतः तिच्या पाठीवर बसण्याचा त्यांस धीर होईना. शेवटी त्या सुसरवाल्याने सर्वतोपरी निर्धास्तपणाची खात्री केल्यानंतर वाटरसन् साहेब, त्यांच्या बरोबरचा मनुष्य व तो सुसरीचा मालक, असे तिघेही आपल्या ओझ्यासहवर्तमान त्या महानदीतून पलीकडे जाण्यास निघाले व थोड्याच वेळांत कोणत्याहि प्रकारचे विघ्न न येतां सुखरूप पार पडले. ती सुसर अगदी दोरी धरल्याप्रमाणे नदीच्या पार गेली. मध्यंतरी तिनें कोणत्याहि प्रकारची विशेष हालचाल केली नाही. थोडेसे सुसकारे मात्र टा कित होती. तिचा वेग साधारण होडीपेक्षां पुष्कळ अधिक होता. पली