या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १९०१. १९९ कडे जाऊन पोचेपर्यंत वाटरसन् साहेबांच्या मात्र जिवांत जीव नव्हता. ते पलीकडे गेल्यानंतर आश्चर्याने अगदी चकित झाले. त्यांस तो केवळ लोकोत्तर चमत्कार वाटला. ह्मणून त्यांनी ती गोष्ट आपल्या देशबांधवांत प्रसिद्ध केली. पण त्या वेळी ती सर्व लोकांस खोटी वाटली. व वाटरसन् साहेबांनी ही एक केवळ कांहीतरी लोणकडी थाप मारली आहे, असेंच लोक ह्मणूं लागले. परंतु पुढे काही दिवसांनीं मिस्तर व्हर्वेकही त्या देशांत गेले; व त्यांनी ती गोष्ट स्वतः अनुभवलेली लिहून कळविली, तेव्हां सर्वांची त्या लोकोत्तर चमत्काराबद्दल खात्री झाली. ह्यावरून कितीही हिंसक व क्रूर प्राणी असो; मनुष्य त्याला आपल्या कबजांत कसा आणतो; त्याला आपला सेवक कसा बनवितो; हे काही सांगता येत नाही. परंतु पंचमहाभूतांनाही ज्याने आपलें दास बनवून सोडले आहे, त्याने बिचाऱ्या जड प्राण्यावर अम्मल बसविला, तर त्यात अधिक तें काय? माकडांची घरटी. घरटी ही बहधा पक्षी बांधतात. पशु बांधित नाहीत. तथापि काहा पशु आपणांस राहावयासाठी विवरें, ढोली वगैरे तयार करतात. माकड किंवा वानर घरटी बांधित असलेली कधी कोणाच्या पहाण्यांत किवा पाकवांत सुद्धा नाहींत. आणि त्यासंबंधाने 'वानराचें घर' अशी एक मणही आहे. ह्मणजे वानर हा प्रत्येक दिवशी रात्री पावसाने भिजला, किवा थंडीने कुडकुडू लागला, ह्मणजे निश्चय करतो की, उद्या सकाळी उजाडले की पहिले काम घर बांधावयाचे. नंतर दुसऱ्या साऱ्या गोष्टी ! पण रात्र जाऊन उजाडले पुरे, की चालला ह्या झाडावरून त्या झाडावर! आणि विसरला पहिले. दुसऱ्या रात्री तोच क्रम. ह्यावरून वानरांना किंवा माकडांना घरटी नाहीत हे उघड दिसते. परंतु 'नानारत्ना वसुंधरा' ह्या मणीप्रमाणे घरटी बांधणारी माकडेही पृथ्वीच्या पाठीवर आहेत. एम. डयू. चेल्न ह्या नांवाचे एक गृहस्थ आफ्रिकेतील प्रवास करून आले. त्यांत त्यांनी पाहिलेले अनेक चमत्कार लिहून ठेवलेले आहेत. ल्यांपैकी एक चमत्कार त्यांनी असा सांगितला आहे की, ज्यांच्या डोक्यावर केस नाहींत, व ज्यांना शेपटें नाहींत, अशी माकडे किंवा वानरें