या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. जमिनीपासून १५ ते २० फूट उंचीवर ज्या झाडास दुबेळके फुटले आहे, व ज्याच्या खाली ढाळी नाही, अशा ठिकाणी आपली घरटी बांधितात. हे घर इतके सुंदर असते की, ते कोणत्याही पहाणारास हे मनुष्याने बांधलेले नव्हे, असें कदापि वाटणार नाही. त्याची रचना इतकी परिपूर्ण असते की, त्यांत पावसाचा एक थेंबही जाऊ नये. पण त्या घरट्यांत ते वानर ८।१० दिवसांपेक्षा अधिक राहत नाहीत! हा एक चमत्कारच मटला पाहिजे.. बर्लिन येथे 'न्याचरल हिस्टरि म्युझियम्' नावाचे एक पदार्थसंग्रहालय आहे. तेथे एक ओयांग ओट्यांग नामक माकडाचे घरटें पैदा करून ठेवलेले होते. हे घरटें प्रोफेसर इझालेका नांवाच्या प्रसिद्ध गृह- . स्थांनी स्वतः, बोनिओ मुक्कामी एका झाडावरून काढून आणलेले होते, तें ॥ फूट लांब, २॥ फूट रुंद, व बाजूने ७ इंच उंच, अशा प्रमाणाचे होते. ते जमिनीपासून ३० फूट उंचीवर, ४५ फूट उंच व सुमारे १ फूट व्यासाच्या(झाडाच्या ढोलीमध्ये होते. त्या झाडाच्या २९ फांद्या एकमेकांस जोडून व एकमेकांत घट्ट बसवून, ते तयार केले होते. आणखी ते इतके मोठे बनविले होते की, एक ओयांग ओट्यांग त्यांत चांगला उभाच्या उभा निजेल. तथापि हा माकड फार सावध असल्यामुळे तो केव्हाही पाय पोटाशीं मुरडून घेऊनच निजतो. हे घरट इतक्या चतुराईने बनविलेले होते की, ती जणों काय एखादी अडोशाची झोंपडीच! परंतु पक्षी आपल्या पिलांकरितां घरटें करितात, तशा उद्देशाने हे मात्र केलेले नव्हते, तर तें त्या माकडाने आपले स्वतःचे शय्यामंदिर ह्मणूनच ते बांधिले होते. त्यांत निजून त्याचें आसपासच्या टेहळणीचे काम सहज होऊन जात असे. पुस्तकपरीक्षा, अनंतनाथस्फूर्ति (अंक 6 वरून पुढे चालू ! ) त्यांतील थोडासा नमुना:-- " नाते मुक्कामी कितीएक आख्याने व अभंग, ह्यांतील कवित्वप्रभाव