या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तेंबर १९०१. २०१ कसा ? तर 'प्रत्यक्ष परमात्मा लेखन करीत आहे' अपरोक्षभावी खात्मभावपर श्रीरामलीला फारच मनोहर छंदांनी युक्त अशी आहे. श्रीकृष्णलीला फारच मजेची. निगमवाणी फारच मनोहर, सर्व विलास परिपूर्ण. सर्व लीला अपरोक्ष भावानें, सर्वांग डोळस, सर्वसाक्षित्वाने अशा ठिकाणी परोक्षभाव आपोआप लयास जाऊन सर्वात्मभाव होतो. असा कवित्त्वप्रभाव आहे. नांदगाव वगैरे इतर ठिकाणीही पुष्कळच ग्रंथ झालेला आहे. सर्वांना शृंगार फार प्रिय आहे. यांत सर्व श्रीकृष्णशृंगार वर्णन केला आहे. तो अकामविलास (विलासाशिवाय झाडाचे पान हालावयाचे नाही, मग रस येणार कोठून ?) सर्व मनोरथ वाचकांचे पूर्ण करणार आहे. सर्व विलास परिपूर्ण असा व पर्दे सुमारे दीड हजार मात्राबद्ध सर्व रसभरित असी आहेत. याप्रमाणे सर्वलीलापरिपूर्ण असे येथून १८१७ साली निघून गेले." संतांना ओळखणारे संत कसे असतात, ते पुढील स्तोत्रांत मूर्तिमंत पाहून घ्यावेत: "ही संतभूमिका या ठिकाणी अनंतलीला अवर्णनीय आहे. कारण गुप्तवास, जावानुसार वर्तन, चित्तचोर स्वभाव, लीला कपटनाटकी, निजभक्तांतरीं प्रगट वास करणारा, दीन झणजे अनुतापी यांविषयीं दयालु, अनाथ झणजे नाथ जो स्वामी अहंकाररहित त्याचे पालक, पतित ( अहंकाररहित) यांना पावन करणारा, असा हा परमात्मा सर्व चराचर नटला आहे. हा सृष्टिचक्राचा पालक नधारी, निरामय झणजे सर्वोपद्रवरहित अशा सहज मेळामध्ये पंथसांप्रदाय गुराशष्यभाव, ब्रह्मचारी हे अहंकारधर्म कोठून असणार ? हे उघड लक्ष्यांत येईल." यापुढे कोठे २००० अभंग; कोठे ४००० अभंग; कोठे ८०० पदें इ. त्पाद हजारों ग्रंथांची ठिकठिकाणची यादी त्यांनी दिली आहे; व प्रत्येकापुढे कार महत्वाचा ग्रंथ' 'सर्वांत शिरोभाग' 'अनंतलीला अपार' इत्यादि वर्णन केले आहे. ते तर असोच, पण शेवटचा जो त्यांनी शेरा मारला आहे, तो तर मनुष्यबुद्धीला केवळ अगम्य होय. तो शेरा हाः-- हे सर्व लिहिणे आत्यंतिक प्रळयांतील आहे." आपणांस थोडीशी गडबड झाली, तर लिहिण्याचे काम सुचत नाही. आणि बुवांनी तर प्रळयांत सारें कवित्व केलें ! ! बरें, प्रळय का होईना ? पण तो तरी सामान्य असावयाचा होता? पण नाही. तो निखालस 'आत्यंतिक !!" पण ही आहे 'अनंतनाथस्फूर्ति !' तेव्हां ती महाप्रळयानंतरच उत्पन्न व्हावी हा सृष्टिक्रमच दिसतो. असो.