या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ ३. आणखी थोडा शब्दलालित्याचा मासला:-- । " अशा प्रकारची ही जगवाणी देहभावी समजाप्रमाणे बरोबर आहे." शब्द शुद्ध काय आणि अशुद्ध काय ? त्याची योजना प्रासंगिक काय, आणि अप्रासंगिक काय, ह्यांचा आमच्या मास्तर साहेबांस मुळीच कांही विधिनिषेध नाही. त्यांत विलास शब्द तर त्यांच्या गळ्यांतील केवळ ताईत. विलासाशिवाय कोणत्याही ग्रंथाचे वर्णन परिपूर्ण व्हावयाचे नाही, किंवा एक पान सुनें जावयाचे नाही. स्नानामध्ये सुद्धा त्यांनी विलासाची योजना केली आहे. पण त्याच्याही पूर्वीच्या विधींत त्यांनी 'विलास' केला असता तर आही त्यांचे काय करणार होतो ह्मणा ! आतां अंतिम प्रसंग सांगण्याची ढब तेवढी दाखवून देऊन चरित्रभाग संपवू. मास्तरसाहेब निर्वाणींचा प्रसंग कथन करतात:-- " सर्वसाक्षी श्रीमदनंत सद्गुरु यांचा नश्वर देह याचा १८२० चैत्र शुद्ध ६ रात्रौ ९ वाजतां मांजरी मुक्कामी अदर्शन झणजे अभाव झाला." र आतां शेवटचा शेराः "या चरित्रांत शरीरी जो जीवात्मा तोच परमात्मा असा ऐक्यभाव धारण करून श्रीमदनंत सद्गुरु हा अविनाशी सर्वांतर्वासी आहे असा भाव ग्राह्य आहे." जाडे जाडे शब्द घालून अर्थाचा बीमोड केला ह्मणजे वेदान्त; टस ट जोडून छंदाची सांखळी जोडली झणजे काव्य; शुद्धाशुद्धांची रेलचेल, व निरर्थक शब्दांची गर्दी झणजे प्रसाद; आणि अहाहा ! काय हो विलास' ! काय हो 'भाव' ! काय हो 'अनंत' ! हे परमात्मज्ञान: असा ह्या भक्तमंडळीचा समज दिसतो. नाही तर विसाव्या शतकांत तें अशा भूमिकेने पुढे आले नसते. भक्ताचा चरित्रभाग हा संपला, आतां भक्तकामकल्पद्रमांचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावयाचे. येवढा वेळपर्यंत 'श्रीमदनंतसद्गुरूचें, त्यांच्या भक्ताने लिहिलेले, व अगाध वेदांतज्ञानाने भरलेले चरित्र आह्मीं आमच्या वाचकांस सादर केले. पण ह्या 'अनंतचरित्रास' एकनाथचरित्र' का ह्मणावें, ह्याचाच आह्मांस उलगडा होत नाही. 'अनंतनाथांचे भक्त त्यांस 'एकनाथां'चा अवतार समजत असतील, पण तेवढ्यावरून त्यास बेधडक तेंच नांव देणे हे बरेंच साहस होय. असो. आतां रा. रा. जी० कृ० पोष्टमास्तर पैठण ह्यांनी 'श्रीमदनंताष्टक' ह्मणून जें लहानों स्तोत्र केले आहे, त्याचा थोडासा मासला वाचकांस दाखवून नंतर प्रत्यक्ष