या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्तंबर १९०१, २०३ 'श्रीअनंतनाथस्फूर्ती'च्या मूर्तीचेच दर्शन घेऊ. अष्टक झणजे केवळ आठ श्लोक, हे काही सांगणे नकोच. त्यांत छंदोभंगाच्या चुक्यांचे चरण इतके आहेत: सोहंभाव' स्फुरे करी समपणीं तल्लीन हो आपणा ॥ SE षष्ठी सोमदिनी सुशुद्ध (सु तें काय ?) BIHAR प्रथमी (काय पण रूप ?) मासांत त्या मांजरी ॥मा । 'स्फु'च्या योगाने 'व'ला व 'प्र'च्या योगाने 'द्ध'ला द्वित्व येऊन छंदोभंग होतो ह्याचे सुद्धा पोष्टमास्तरसाहेबांपाशी अज्ञान ! त्यांच्या मते ठपकर पोष्टाचा शिक्का मारला-मग त्यांतील अक्षरें पुरती दिसोत किंवा न दिसोत-की काम आटोपते, त्याचप्रमाणे कवितेची गोष्ट आहे ! एकदा का 'शार्दूळविक्रीडित' हाणून छाप मारला की, साऱ्या अक्षरांनी त्या छंदांत येऊन बसलेच पाहिजे. आतां यतिभंगाच्या मासल्याचे चरणः-- सह्याद्रीतटिं पार पश्चिम समु-द्राचे पुनीता भुमी । बोले तेसरी [शब्दाची खुमारी लक्ष्यांत असावी ] वर्तुनी जगि निजा-नंदांत राहे सदा ॥ वरच्या विशेष दोषांमध्ये व्हस्वदीर्घादि दोषांची उदाहरणेही नाहीत असे नाही. तथापि अर्थाच्या संबंधाने कोणताच विचार न करता केवळ व्हस्वदीर्घाचा वरविहार स्पष्ट कळण्याकरितां एक दोन चरणच दाखल करून हे अष्टक संपवू. ते चरण हे: "नित्यानित्य विचारभाव सहजी ठायीं उदासीनि त्या । "साधू संत मुनी महंत कविही वैरागि कोवीद त्या ॥ वरच्या चरणांतील जाड टाइपांनी घातलेल्या शब्दांकडे लक्ष्य पुरविले झणजे पोष्टमास्तरसाहेबांनी सरस्वतीमंदिरांत घातलेला धुडगुस सहजी लक्ष्यांत येईल. असो. येथपर्यंत भक्तमंडळींचा स्तोत्रपाठ संपला. आतां 'सर्वलीलापरिपूर्ण' अशी 'अनंतनाथस्फूर्ति' व 'अपार लीलावी श्रीमदनंत यांचा कवित्वप्रभाव पहावयाचा व त्यावर 'जगवाणी' काय ह्मणते तिचा विचार करावयाचा. अनंतनाथांचें कवित्व त्यांच्या नामाप्रमाणेच अनंत आहे ह्यांत शंका नाही. एके ठिकाणी १००० अभंग केले, तर दुसऱ्या ठिकाणी ४००० केले ! एके ठि. काणी रामलीलातर दुसऱ्या ठिकाणी कृष्णलीला! एके ठिकाणी एकनाथचरित्र पर दुसऱ्या ठिकाणी सुरस पदांचा तांडा! त्यांतील त्यांच्या भक्तमंडळीने सारी १००११२५ पृष्ठेच काय ती अवघीं छापून काढली आहेत. पण तेवढीच चा