या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. ळतांना आमच्या नाकी नऊ आले. मग साऱ्या अनंताचा अंत लागावा कसा ? परमात्मा'च जेथे प्रत्यक्ष येऊन कवित्वाची टांकसाळ घालू लागला, व अनंत. रूपी काव्यरत्नाकर आपल्या अनंतहस्तांनी काव्यरत्ने आमच्या आंगावर फेंकू लागला, तेथे आझी दोन हातांची पामरें गोळा ती किती करणार ? तथापि 'आकाशअंत न कळोनिहि अंतरिक्षी । आकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षी' ह्या न्यायाने आंत प्रवेश करवेल तेथपर्यंत करून ठाव पहावयाचा. छंदोमंगांतील घोडचूकच पहाणे असल्यास खालचा चरण पहावाः सौख्याचा लवलेश शोध करितां न येत दृष्टीस ज्या ॥ वाहवारे 'न' !! प्रत्यक्ष अनंतनाथाच्या स्फूर्तीनेच जेथें उचल खाल्ली, तेथील ठावठिकाण आझांसारख्या अप्रासादिक पामरास लागणार कसा, व ती 'अपारभावी लीला' उमगणार कशी? 'स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती' असें मयूर कवीने झटल्याप्रमाणे ह्या 'अनंतनाथस्फूर्ती'चे यथातथ्य निरूपण करण्यासही प्रत्यक्ष 'श्रीमदनंत'च रसिकरूपाने 'अपारभावी' 'परिपूर्ण लीला' करावयास अवतरला पाहिजे. तोपर्यंत आह्मीच चालताचालत करून घेतों, ह्या 'स्फूर्तीतील' अद्भुत प्रसाद झटला ह्मणजे वृत्तांची नांवें बदलावयाची, शुद्धाचे अशुद्ध करावयाचें; हस्वाचे दीर्घ करावयाचें; दीर्घाचें -हस्व करावयाचें; मनास वाटतील ते शब्द मनास वाटतील तेथें दडपून द्यावयाचे, आणि अर्थाचा पत्ता लागू द्यावयाचा नाही. जणों काय कविता मणजे टांकसाळेतील नाणे ! 'एक धड ना भाराभर त्या चिंध्या काशाला ?' हेच आझांस समजत नाही. ह्या आमच्या ह्मणण्याच्या समर्थनासाठी काही थोडी पद्ये दाखल करतो. कारण तें "सर्व लिहिणे आत्यंतिक प्रळयांतील आहे !" प्रथमारंभी 'श्रीनाथलीला'-अर्थात् श्रीएकनाथ महाराजांचे चरित्र विस्तृत रीतीने लिहिलेले आहे. परंतु तें सर्व ओवीबद्धच असल्यामुळे त्याचे 'सुक्षम' परीक्षण करण्याचे भरीस न पडतां पुढील भागापासूनच प्रारंभ करतो. हे प्रकरण हाणजे “हितसार" हे होय. आतां ऐकाः-- and इंद्रवज्रावृत्त. (!!!) तदा सूख वाटे मना देव भेटे । तुटे कार हा संसृती अंगि मीटे ॥ बरा बोध हा मानसामाजि घेई। नको मानु या तनूची बढाई ॥ १ ॥ महंतीभराने बरा वागतोसी । अभीमानयोगें बरा ताठ होसी ॥ कसी नाहिंरे लाज ती तूज अंगीं। फजीती फुकां कां उगी देहभागी ॥१॥